crime cases in ratnagiri wife attack on husband for disputes 
कोकण

पतीने रुमचं भाडं दिलं नाही ; संतापलेल्या दुसऱ्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : आपण राहात असलेल्या रूमच्या भाड्याचे पैसे न दिल्यावरून संतापलेल्या दुसऱ्या पत्नीने पतीवर हल्ला केला. या हल्ल्यात तिने पतीच्या डोक्‍यात, हातावर, पाठीवर सुरीने वार केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा पत्नीवर दाखल केला आहे.  

सलवा समद जयगडकर (रा. मुरुगवाडी, रत्नागिरी) असे संशयित महिलेचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (८) दुपारी सव्वादोनच्या सुमारास रेहबर रेसिडेन्सी दुसरा मजला, राजिवडा-निवखोल येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार समद अलिमियाँ जयगडकर (वय ४१, रा. राजिवडा-निवखोल, रत्नागिरी) हे आणि संशयित नात्याने पती-पत्नी आहेत. सलवा ही त्यांची दुसरी पत्नी आहे.

समद हे घरी असताना सलवा तेथे आली ती राहात असलेल्या रुमच्या भाड्याचे पैसे दिले नाहीत, या रागाने दमदाटी करून शिवीगाळ केली. रागाच्या भरात सुरी घेऊन समद यांच्या डोक्‍यावर, दोन्ही हातावर व पाठीवर मारून दुखापत केली. या प्रकरणी समद जयगडकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल पालांडे करत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

SCROLL FOR NEXT