crime news in ratnagiri lanja brothers disputes and attack on brother 
कोकण

भाऊ म्हणायचा की वैरी ; सख्ख्या भावाच्या डोक्‍यात त्याने घातली पहार

सकाळ वृत्तसेवा

लांजा (रत्नागिरी) : शेजाऱ्याची आणलेली कुऱ्हाड परत कर, असे सांगणाऱ्या सख्ख्या भावाच्या डोक्‍यात भावानेच पहार घातली. ही घटना बुधवारी (ता. १०) सकाळी तालुक्‍यातील वेरवली बुद्रुक येथे घडली. याबाबत लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्‍यातील वेरवली बुद्रुक येथील सचिन शंकर अडबल (३२ वर्षे) याचा सख्खा भाऊ रूपेश शंकर अडबल यांनी त्यांच्या शेजारी राहणारे राजाराम गंगाराम अडबल यांच्या मालकीची कुऱ्हाड व कोयती त्यांना न सांगता आणली होती. याची माहिती राजाराम अडबल यांना मिळतात त्यांनी रूपेश अडबल यांना कुऱ्हाड व कोयती परत आणून द्या, असे सांगितले होते; मात्र रूपेश अडबल यांनी राजाराम अडबल यांची कुऱ्हाड व कोयती परत दिली नाही. त्यामुळे राजाराम अडबल यांनी रूपेश अडबल यांचा भाऊ सचिन अडबल यांना तुझ्या भावाने नेलेली कुऱ्हाड व कोयती आणून दे, असे सांगितले.

राजाराम अडबल यांनी सांगितल्याप्रमाणे सचिन अडबल यांनी आपला भाऊ रूपेश अडबल यांना बुधवारी सकाळी आठच्या सुमारास राजाराम अडबल यांची आणलेली कुऱ्हाड व कोयती परत कर, असे सांगितले. याचा रूपेश अडबल यांना राग आला आणि त्यांनी भाऊ सचिन यांना मारहाण केली. या वेळी शेजारी असलेली लोखंडी पहार उचलून रूपेश अडबल यांनी सचिन अडबल यांच्या डोक्‍यात डाव्या बाजूला मारली. यामध्ये सचिन अडबल यांच्या डोक्‍याला दुखापत झाली. जखमी अवस्थेतच सचिन अडबल यांनी लांजा पोलिसांत रूपेश यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

बाबर आझमवर आली ७ वर्षांनंतर डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची वेळ; खराब फॉर्म अन् पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर PCBचा मोठा निर्णय

IPS भानु प्रताप कोण? UPSCच्या तयारीवेळी प्रेमविवाह, आता पत्नीने केले गंभीर आरोप; लेकीची बॅग घेऊन घरासमोर बसली

Latest Marathi News Update : धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

SCROLL FOR NEXT