crime news in ratnagiri lanja one young person attack on doctors and family 
कोकण

तुम्ही माझ्या जागेत आला आहात म्हणत तरुणाने डॉक्टरांसह कुटुंबियांना केली मारहाण

सकाळ वृत्तसेवा

लांजा (रत्नागिरी) : आपल्या मालकीच्या जागेतील घरदुरुस्तीचे काम करणाऱ्या डॉक्‍टरांना तुम्ही माझ्या जागेत आला आहात, असा दावा करून शिवीगाळ आणि घरात घुसून मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना ठार करण्याची धमकीही दिल्याची घटना प्रभानवल्ली-गुरववाडी येथे घडली. या प्रकरणी लांजा पोलिसांनी प्रभानवल्ली येथील एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभानवल्ली गुरववाडी येथे विश्राम कृष्णा गावखडकर (वय ५२) हे गेली १३ वर्षे वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. प्रभानवल्ली गणेशखोरे येथील अब्बास उस्मान नाईक व त्यांचे बंधू यांची प्रभानवल्ली गुरववाडी येथील सार्वजनिक १५ गुंठे जमिनीपैकी अब्बास नाईक यांच्या वाट्याला आलेली साडेपाच गुंठे जागा डॉ. विश्राम गावखडकर यांनी खरेदीखत करून रितसर विकत घेतली होती. या जागेमध्ये त्यांनी घर बांधले होते.

विश्राम गावखडकर यांनी महिनाभरापासून घराच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. दुरुस्तीचे काम करत असताना महिनाभरापूर्वी प्रभानवल्ली गणेशखोरे येथील अब्बास यांचा पुतण्या मोहसिन कासम नाईक यांनी घराच्या ठिकाणी जाऊन डॉक्‍टर यांना तुम्हाला दिलेल्या जागेपेक्षा अधिक आमच्या जागेत आला आहात. तुम्ही घर चुकीच्या पद्धतीने बांधत आहात, असे म्हटले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. महिनाभरापूर्वी झालेल्या वादाचा राग मोहसिन यांच्या मनामध्ये धगधगत होता.

यातूनच मंगळवारी रात्री ११ वाजता मोहसिन याने डॉ. विश्राम गावखडकर यांच्या घराच्या अंगणात येऊन शिवीगाळ केली. त्यानंतर कडी तोडून घरात घुसून डॉ. विश्राम, त्यांची पत्नी विद्या, मुलगा आकेश यांना मारहाण केली. या झटापटीत विद्या यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटले. मारहाणीत या कुटुंबीयांना दुखापत झाली. मोहसिन घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने अंगणात उभी असलेली दुचाकीही ढकलून दिली. या प्रकरणी डॉ. विश्राम गावखडकर यांनी बुधवारी (ता. १०) सायंकाळी लांजा पोलिसात फिर्याद दाखल केली.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT