the criticised on maratha reservation by vinayak mete in ratnagiri press conference 
कोकण

'मराठा आरक्षण स्थगितीला सरकारच जबाबदार'

सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : मराठा आरक्षण स्थगितीचा फटका वैद्यकीय प्रवेशावर झालाय. आर्थिक मागास दुर्बल घटकांसाठी असलेले केंद्राचे आरक्षण राज्य सरकारकडून मिळावे, ही मागणी आहे. जर हे आरक्षण दिले असते तर मराठा समाजाची जवळपास ६०० पेक्षा जास्त मुले वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहिली नसती.

आज जे नुकसान झाले आहे, त्याला सरकारची निष्क्रियता आणि सरकारमधील काही मराठा समाजाचे मंत्री जबाबदार असल्याचा आरोप ‘शिवसंग्राम’चे नेते विनायक मेटे यांनी केला. खेडमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी संघटनेचे सरचिटणीस विक्रांत आंब्रे उपस्थित होते. ते म्हणाले, की सरकारचे जर हे असेच सुरू राहिले तर शिवसंग्राम कोर्टात जाईल. ओबीसी आणि मराठा समाजात तेढ कशी निर्माण होईल, हे पाहण्याचे काम सत्ताधारी पक्षातले आणि सरकारमधील काही मंत्री करत आहेत. गोरगरिबांनी वीज वापरलीच नाही, त्यांना मात्र भरमसाट बिले दिली.

जे मंत्री भरमसाट वीज वापरतात, त्यांना वीज बिल नाही. हा दुजाभाव सरकार करत असल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला. तसेच या प्रकरणी शिवसंग्रामसुद्धा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा विनायक मेटे यांनी दिला. याबाबत दोन दिवसात ऊर्जामंत्र्यांशी बैठक होणार असल्याचे मेटे यांनी सांगितले. 

...ही घोषणा लांबच राहिली 

वाढीव वीज बिले देऊन सरकारने सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा घातला, याचा आम्ही निषेध करत असल्याचे मेटे यांनी सांगितले. शंभर युनिट वीज आम्ही मोफत देऊ, असे आश्वासन देण्यात आले. ही घोषणा लांबच राहिली. मात्र, अशा पद्धतीने वाढीव वीजबिले देणे अतिशय चुकीचे आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT