criticized by nitesh rane on topic of pooja chavan on shivsena ;eaaders in sawantvadi 
कोकण

"पर्यावरण मंत्र्यांची ‘दिशा’ चुकली, वनमंत्री ‘पूजा’ घालण्याच्या लायकीचे नाहीत, बाकी मंत्र्यांचे 'कहानी घर घर की' चालू"

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : परळीत राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिने पुण्यात नुकतीच आत्महत्या केली. या प्रकरणावरुन सध्या गदारोळ माजला आहे. या प्रकरणात शिवसेनेचा मंत्र्यांचे नाव आल्याने विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधत, या महाविकास आघाडी सरकारच्या दूरदृष्टीला सलाम! यांना माहीत होते, पर्यावरणमंत्र्याची "दिशा" चुकली, मग आता वनमंत्री "पूजा'' घालण्याच्या लायकीचे  राहिले नाहीत, असा टोला आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करुन लगावला आहे. 

राणे म्हणतात, बाकी मंत्र्यांचे पण "कहानी घर घर की" चालू आहे आणि म्हणूनच ''जेल पर्यटन"चालू केले असावे! जनता मंत्र्यांना अजुन कुठे भेटणार ? अशी प्रतिक्रीया देत काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारने जेल पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता त्या मुद्दयावरुन सरकारवर हल्लाबोल केला. जे दिशा बरोबर झाले तेच पूजा बरोबर होणार असेल तर तो शक्ती कायदा का आम्ही चाटायचा का? असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणी भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी थेट शिवसेनेच्या मंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी केली जाईल, मात्र यानिमित्ताने कोणाला आयुष्यातून उठण्याचा प्रकार होता कामा नये अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT