crocodile in banda sindhudurg area people fear and demand to found fastly 
कोकण

मगरींच्या वास्तव्याने गावकरी हैराण ; पकडणेही झाले कठीण

सकाळ वृत्तसेवा

बांदा (सिंधुदुर्ग) : बांदा-आरोसबाग येथील तेरेखोल नदीपात्रात भल्या मोठ्या मगरीचे वास्तव्य असून ही मगर होडीतून प्रवास करणाऱ्या व पुलाचे बांधकाम करणाऱ्या कामगारांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने जवळ येण्याचा प्रयत्न करत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मगरीचा वनखात्याने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी आरोसबागवासीयांतून होत आहे. 

आरोसबाग नदीपात्रात मगरींचे वास्तव्य मोठ्या संख्येने आहे. गेल्या काही दिवसांपासून एका भल्यामोठ्या मगरीचा वावर याठिकाणी आहे. आरोसबागवासीयांना बांदा शहरात येण्यासाठी नदीपात्रात होडीतून प्रवास करावा लागतो. याठिकाणी पुलाचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. मगर माणसांच्या जवळ येण्याचा सातत्याने प्रयत्न करत असल्याने या मगरीचा त्रास स्थानिकांबरोबरच पुलाचे काम करणाऱ्या कामगारांना देखील होत आहे. याबाबत स्थानिकांनी बांदा वनपाल अनिल मेस्त्री यांना संपर्क साधून मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. 


पकडणे कठीण 

वनपाल मेस्त्री यांनी आपल्या सहकाऱ्यांसह याठिकाणी भेट देत पाहणी केली. त्यावेळी नदीपात्र खोल व विस्तीर्ण असल्याने पाण्यात जाऊन मगरीला पकडणे कठीण असल्याचे सांगितले. ज्यावेळी मगर तीरावर पहुडलेली असेल, त्यावेळी मगरीला पकडण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन मेस्त्री यांनी दिले.  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स सहावे जेतेपद पटकावणार का? एक गोष्ट जी वाढवू शकते टेंशन, जाणून घ्या त्यांची बेस्ट Playing XI

Pune News: पुण्यातील बुधवार पेठेतील पोलिसांची अल्पवयीन मुलींवरील कारवाई बेकायदेशीर; तथ्यशोध समितीचा आरोप, बालहक्कांचे उल्लंघन!

Share Market Trading: शून्य ब्रोकरेज की १००% लोभ? 'मोफत' ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सचे धक्कादायक वास्तव; गुंतवणुकीआधी नक्की वाचा

'साईबाबा मला दिसले...' संकर्षण कऱ्हाडे साईचरणी नतमस्तक, अनुभव सांगताना म्हणाला...

Ram Navami: राम नवमीला एक नाही तर चक्क दोन सार्वजनिक सुट्ट्या; योगींनी का घेतला हा निर्णय ?

SCROLL FOR NEXT