Crocodile bit the young man's leg Sakal
कोकण

पन्हाळेकाजी येथील नदीत युवकाच्या पायाला मगरीने घेतला चावा

युवकाला उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ - दापोली तालुक्यातील लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पन्हाळेकाजी येथील नदीत म्हैशी धुण्यासाठी गेलेल्या एका युवकाच्या पायाला मगरीने चावा घेतल्याची घटना आज सायंकाळी 5 घडली असून या युवकाला उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पन्हाळेकाजी येथील प्राणिल जाधव हे 32 वर्षीय युवक 12 ते 13 म्हैशी धुण्यासाठी घेऊन गावातील कोटजाई नदीत गेले होते. अचानक नदीतील मगरीने त्यांच्या मांडीला मागून चावा घेतला. नदी किनारी असलेल्या प्राणिल यांच्या मित्राने या मगरीला दगड मारून हुसकावून लावले यामुळे प्राणिल यांचे प्राण वाचले.

या नदीत सुमारे 100 मगरी असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असून अनेक गुरांचे प्राण या मगरीने घेतलेले असून या मगरीचा बंदोबस्त वनविभागाने करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून यापुर्वीही करण्यात आली आहे. दरम्यान प्राणिल जाधव यांना उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना झालेल्या जखमेवर टाके घालण्यात आले आहेत.

मी कंबरेपर्यंत पाण्यात उभा राहून म्हैशीना धूत असताना एका 6 मीटर लांबीच्या मगरीने माझ्यावर हल्ला केला, मी तेव्हा प्रतिकार केल्याने मी वाचलो.

- प्राणिल जाधव, पन्हाळेकाजी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Farmer : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! कर्जमाफीचा निर्णय लवकरच, बावनकुळेंची कोल्हापुरात ग्वाही

VIDEO : कराड–पाटण मार्गावर दारु पिऊन तरुणीचा रस्त्यावर धिंगाणा; बोनेटवर बसून गाड्या अडवत घातला गोंधळ, दगडफेकही केली

ईशा केसकरने सांगितलं 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिका सोडण्याचं कारण, म्हणाली...'जीवापाड मेहनत करुनही जर...'

Winter Tips: तुमचेही हिवाळ्यात केस खुप गळतात का? मग घरच्या घरी 'हे' सोपे उपाय

Horoscope Prediction : आठव्या घरात गुरु ग्रहाची छाया! कामधंदा, नातेसंबंध अन् मानसिक शांतीवर होईल गंभीर परिणाम, आजच करा हा सोपा उपाय

SCROLL FOR NEXT