crocodile seen in gallery today morning in sindhudurg sawantwadi 
कोकण

सकाळी उठून गॅलरीत गेलो अन् डोळ्यासमोर जे दिसलं, त्यानं उडला थरकाप

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : आरोंदा-खासकिलवाडी येथील लाकूड गिरणीलगत असलेल्या दिगंबर जोशी यांच्या घराच्या गॅलरीत सकाळी चक्क 5 फूटी मगर आढळून आली. वनविभागाने तिला ताब्यात घेत नैसर्गिक अधिवासात सोडले. नदी, तलाव ओहळात आढळून येणाऱ्या मगरी आता आपला नैसर्गिक अधिवास सोडून नागरी वस्तीत घुसू लागल्या आहेत. अलीकडे या घटनांमध्ये वाढ होत आहे. 

बऱ्याच वेळा मगरींकडून पाळीव जनावरांवर हल्ला होण्याच्या घटना घडल्या आहेत. अलिकडे मात्र बऱ्याच मगरी नागरी वस्तीत घुसलेल्या बातम्या पुढे येत आहेत. आरोंदा भागातही मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर वाढला आहे. आज सकाळी आरोंदा खासकिलवाडी येथील लाकूड गिरणीलगत असलेल्या जोशी यांच्या घराच्या गॅलरीत सकाळी चक्क 5 फूटी मगर दिसून आली.

त्यांनी याबाबतची कल्पना शेजाऱ्यांना दिल्यानंतर तेथील भाजपचे आरोंदा विभागीय अध्यक्ष आबा सातोस्कर यांनी वनविभागाला याबाबत कळवले. त्यानंतर आजगाव वनपाल चंद्रसेन धुरी, नेमळे वनरक्षक रमेश पाटील, वनसेवक बबन रेडकर, चालक जंगले आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या मगरीला जेरबंद करीत तिला नैसर्गिक अधिवासात सोडले. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... 'लालबागचा राजा'च्या चरणी भरभरुन दान, ३ दिवसांत कोट्यवधींची देणगी; आकडा पाहून व्हाल थक्क!

Nandigram Bypoll : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची अचानक माघार, नेमकं काय घडलं?

LP Gas Tanker Accident: वाडाखडकोना येथे एलपी गॅस टँकर कलंडला; गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Festival Makeup Skin Care: सणासुदीला मेकअपमुळे त्वचा बिघडतेय? १० मिनिटांत करा ‘हा’ घरगुती राइस जेल; चेहरा दिसेल फ्रेश

SCROLL FOR NEXT