Crowd of beach tourists for Christmas New Year celebration action for violating the rules 
कोकण

ख्रिसमस, न्यू ईयरसाठी समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी; नियमांचं उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई

राजेश कळंबटे

रत्नागिरी : नाताळ आणि नवीन वर्षाच्या जल्लोषासाठी महापालिका क्षेत्रांसह काही पर्यटन स्थळांवर गर्दी होऊ नये यासाठी बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे बराचसा पर्यटक वर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे वळण्याची शक्यता आहे. कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. त्यामुळे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खासगी फार्म हाऊससह गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रीत केले असून नियमांचे पालन होते की नाही यावर करडी नजर ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात अद्याप तरी कोणतेही कडक असे निर्बंध नसले तरीहि येणार्‍या पर्यटकांनी, व्यापार्‍यांनी आणि स्थानिकांना कोरोना काळातील नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात येत आहे. त्यामुळे कुणीही हलगर्जीपणा करु नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील हॉटेल आणि लॉजिंग देखील या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयार झाले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईलाही सामोरे जावे लागणार आहे.

महानगरपालिका क्षेत्रांमध्ये रात्री संचारबंदी केल्याने अनेकांनी छोट्या शहरांसह ग्रमीण भागाला पसंती दिली आहे. अथांग असा समुद्र, मंदिरं, प्रसिद्ध अशी ठिकाणी, डोंगरदर्‍यामधून वसलेली टूमदार गावे आणि सर्वत्र हिरवाई असे वातावरण सध्या जिल्ह्यात आहे. त्या ठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढत आहे. नाताळ, नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी, पर्यटकांसाठी विविध सुविधा देण्यासाठी स्थानिक व्यापारी आणि नागरिक देखील सज्ज झाले आहेत. राजापूर, दापोली, गुहागर, रत्नागिरी या तालुक्यांमध्ये अनेक प्रसिद्ध ठिकाणं असल्याने सध्या पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहे. यावर्षी पर्यटनस्थळी निवास करणार्‍या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे.

एमटीडीसीच्या निवासस्थानांचे शंभर टक्के आरक्षण फुल्ल झाले आहे.नवीन वर्षाचं स्वागत करताना उत्साहाच्या भरात गालबोट लागणार नाही याची काणजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.कोकणात पारा घसरला असून थंडीही वाढलेली आहे. किनार्‍यांसह विविध पर्यटनस्थळांवरील वातावरण अल्हाददायक आहे. नव वर्षाच्या स्वागतासाठी पूरक परिस्थिती असल्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साह आहे. सध्या गणपतीपुळेमध्ये दररोज तीन ते चार हजार पर्यटक हजेरी लावून परतत आहेत. दापोली तालुक्यात पारा 8.9 अंशापर्यंत खाली आले आहे. रत्नागिरीतही पारा 17 अंशापर्यंत खाली आला आहे. किनारी भागात परिस्थिती चांगली असल्यामुळे पर्यटक मोठ्याप्रमाणात दाखल होतील.

जलक्रीडांना मान्यता
गणपतीपुळेसह जिल्ह्यातील विविध किनार्‍यांवर सुरु असलेल्या जलक्रीडांना शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे पर्यटकांना समुद्र सफरीचा आनंद घेता येऊ शकणार आहे. त्या माध्यमातून बंद पडलेला शेकडो लोकांचा रोजगार पुन्हा सुरु झाला आहे. यामधून लाखो रुपयांची उलाढाल होईल.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT