Crowd in Sawantwadi to buy fish
Crowd in Sawantwadi to buy fish 
कोकण

सोशल डिस्टन्सचा फज्जा, मासळी खरेदीस गर्दी

भूषण आरोसकर

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. खरेदीसाठी बाजारपेठेत आणि विशेषतः मच्छी मार्केटमध्ये काल मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. मासे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला तर अनेकांच्या तोंडाला मास्कही नव्हते. 
तालुक्‍यात आतापर्यंत कोरोनाचे 25 बळी गेले आहेत. तरीही नागरिक निष्काळजीपणे वागत असल्याचे दिसते. कोरोनाचा प्रादुर्भाव संपला, असे समजून नागरिक बाजारपेठेत गर्दी करत आहेत.

शहरामध्ये कोरोना अधिक वेगाने वाढत आहे; मात्र तरीही रस्त्यावर, दुकानात आणि भाजी मार्केटमध्येही गर्दी होत आहे. काल मोठ्या प्रमाणात मच्छी मार्केटमध्ये गर्दी दिसून आली. पालिकेच्या या अद्ययावत मच्छी मार्केटमध्ये दोन मजले असून दोन्ही मजल्यावर खरेदीसाठी झुंबड उडाली. सोशल डिस्टन्स व मास्क परिधान करणे बंधनकारक आहे; परंतु नागरिकांमध्ये सतर्कता दिसत नाही. त्यामुळे हा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT