Crowds of tourists in Ganpatipule lakhs Of Turnover on the first day 
कोकण

गणपतीपुळेत पर्यटकांची गर्दी,  पहिल्याच दिवशी लाखोंची उलाढाल 

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - वॉटर स्पोर्टस्‌ला एक महिन्यानंतर राज्य शासनाकडून हिरवा कंदिल मिळाल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या व्यावसायावर अवलंबून असलेल्या शंभरहून अधिक लोकांचा रोजगार सुरू झाला. गणपतीपुळे येथे पहिल्याच दिवशी पर्यटकांनी समुद्र सफरीसाठी गर्दी केली होती. यामधून सुमारे एक लाख रुपयांची उलाढाल झाली. 

कोरोनामुळे सर्वच जग थांबले होते. त्याचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यावसायिकांना बसला. सरत्या दिवाळीत मंदिरे सुरू झाली आणि पर्यटन व्यवसायाला झळाळी मिळाली; परंतु हा आनंद वॉटर स्पोर्टस्‌ चालकांसाठी औटघटकेचा ठरला. समुद्र सफरीसाठी पाण्यात जाणाऱ्या बोटीमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवले जात नाही, सॅनिटायझर वापरत नाहीत असा ठपका ठेवत कोरोनाचे कारण देऊन जलक्रीडांवर बंदी घालण्यात आली. सात महिन्यांनी सुरु झालेला व्यावसाय दोनच दिवसात बंद झाला. त्यानंतर जलक्रीडा व्यावसायिकांची तारांबळ उडाली. 

रत्नागिरी जिल्ह्यात आरेवारे, काजिरभाटी, गणपतीपुळे, गुहागर, दापोली तालुक्‍यातील मुरुड यांसह बऱ्याच किनाऱ्यावर जलक्रीडा सुरू आहेत. यामध्ये काही कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. पैसे मिळवायच्या दिवसात घातलेल्या बंदीने व्यावसायिक हळहळले होते. गणपतीपुळे सारख्या पर्यटनस्थळावर दिवसाला चार ते साडे चार हजार पर्यटक भेटी देत होते. त्यातील 10 टक्‍के लोकांनी जलक्रीडांचा आस्वाद घेतला तरी त्यामधून हजारो रुपयांचा फायदा व्यावसायिकांना होणार होता.

स्थानिक आमदारांपासून ते पर्यटनमंत्र्यांपर्यंत सर्वांनाच या व्यावसायिकांनी साकडे घातले. त्याला यश आले असून दोनच दिवसांपुर्वी बंदर मंत्री अस्लम शेख यांनी वॉटर स्पोर्टस्‌ला परवानगी देत असल्याचे जाहीर केले. त्यासाठी आवश्‍यक ती मार्गदर्शक तत्वेही घालून दिले आहे. सॅनिटायझिंग, मास्क यावर बंधने घालण्यात आली आहेत. गणपतीपुळेत अजुनही दिवसाला चार हजार पर्यंटक येऊन जात आहेत. जलक्रीडांचा आस्वाद घेता येत नसल्याने अनेक पर्यटकही नाराज होते; मात्र शनिवारपासून समुद्र सफरींचा आनंद घेण्यास पर्यटकांना मिळू लागला आहे. 

जलक्रीडा सुरू करण्यास परवानगी मिळाली असून कोरोनातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करुन व्यावसायिक कार्यरत आहे. पर्यटकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
- उदय पाटील, अध्यक्ष वॉटरस्पोर्ट व्यावसायिक संघटना, गणपतीपुळे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT