konkan kanya sakal
कोकण

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या 'या' गाड्या रद्द; असे आहे वेळापत्रक

सकाळ डिजिटल टीम

कणकवली (सिंधुदुर्ग) : कोकण रेल्वे मार्गावरील रोहा आणि वीर स्थानकादरम्यान रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरण काम हाती घेतल्याने आज तारीख ३० ऑगस्ट रोजीच्या कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. मंडगाव ते मुंबई धावणारी मांडवी एक्सप्रेस, मंडगाव ते एलटीटी मंडगाव स्पेशल या गाड्यांचा समावेश आहे. याबाबत कोकण रेल्वेने संकेतस्थळावर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, वीर आणि रोहा विभागांमध्ये रेल्वे ट्रॅकचे दुपदरी करणाचे काम सुरू आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द करून तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.

बदल करण्यात आलेल्या गाड्यांचे वेळापत्रकात

मुंबई ते मंडगाव क्र. ०१०८५ ही गाडी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. तसेच गाडी क्र. ०१११३ मुंबई सीएसएमटी ते मंडगाव जंक्शन मांडवी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच मंडगावहून मुंबईकडे जाणारी ०१११४ ही अप मांडवी एक्सप्रेस ही आज रद्द करण्यात आली आहे. मंडगाव जंक्शन ते एलटीटी ही विशेष गाडी ही रद्द करण्यात आली आहे. तसेच तसेच ०२४१३ मंडगाव ते निजामुद्दीन ही आज नियोजित वेळेपेक्षा तीन तास उशिराने धावणारा आहे. गाडी क्रमांक ०११५२ मंडगाव जंक्शन ते सीएसटी जनशताब्दी एक्सप्रेस ही आज मंडगाव येथून दोन तास उशिराने सुटणार आहे.

वीर आणि रोहा विभागांमध्ये रेल्वे ट्रॅकचे दुपदरी करणाचे काम सुरू आहे.

कोकण रेल्वे मार्गावर धावणारी कोकणातल्या चाकरमान्यांची आवडीची एक्सप्रेस कोकण कन्या आज दुसऱ्या दिवशीही तब्बल 4 ते 5तास उशिराने धावणार अशी सकाळी माहिती मिळाली होती. मात्र काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काल रविवारी या गाडीमध्ये बिघाड झाल्याने ही गाडी रेल्वे मार्गावर उशिराने धावली होती. त्यामुळे गाडीतील प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते. कोकण रेल्वे मार्गावरील मुंबई सीएसटी ते मडगाव अशी धावणारी कोकण कन्या रविवारी उशिराने रात्री सीएसटी स्थानकावरून सुटल्यानंतर नियोजित वेळेपेक्षा चार ते पाच तास उशीराने धावत असून सकाळी साडे आठचच्या सुमारास ही गाडी चिपळूण पर्यंत पोचली होती.

गाडी नियोजित वेळेपेक्षा चार तास उशिराने धावत आहे. त्यामुळे गाडीतील प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहे. सलग दुसऱ्या दिवशी गाडी उशिराने धावत आहे आज कृष्ण जन्माष्टमी व्रत आहे. त्यामुळे गाडीतील प्रवाशांचे गावकडील घरी वेळेवर पोहचणे आवश्यक असताना गाडीला उशीर होत असल्याने प्रवाशांना अडचणी वाढल्या आहेत.चाकरमान्यांना कोकणात यायचे वेध लागले असतानाच आता कोकण रेल्वेच्या बदललेल्या वेळापत्रकामुळे हिरमोड झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

Yavatmal: पत्नीच्या खुनात पतीला सश्रम कारावास; बीएनएसस कायद्यांतर्गत प्रकरण निकाली; तक्रारीचे अभिलेख ठरले महत्वाचे

SCROLL FOR NEXT