कोकण

रत्नागिरीत ‘दक्षिणायन’ चित्रपट महोत्सव आज

सकाळवृत्तसेवा

नाचणे - रत्नागिरी येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी. विद्यानिकेतन एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील बृहद्‌ भारतीय समाज सभागृहामध्ये महिला विकास कक्षातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ‘दक्षिणायन’ चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये जागतिक स्तरावर गाजलेले एकूण नऊ चित्रपट निःशुल्क प्रदर्शित होणार आहेत.

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयामध्ये ८ मार्चला सकाळी १० वाजता नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांच्या हस्ते चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्त्री-पुरुष समता रुजविण्यासाठी प्रसिद्ध भाषा तज्ज्ञ पद्मश्री डॉक्‍टर गणेश देवी यांच्या पुढाकाराने दक्षिणायन चळवळ गेल्या दोन वर्षापासून सक्रिय आहे. देशभरातील अनेक लेखक, पत्रकार व विविध क्षेत्रातील कलावंत या चळवळीत सहभागी झालेले आहेत. चित्रपट महोत्सवाची संकल्पना प्रसिद्ध अभिनेते आणि दक्षिणायन चळवळीचे सहकारी अमोल पालेकर यांची आहे. अमोल पालेकर आणि चित्रपट समीक्षक संध्या गोखले यानी या महोत्सवाकरिता चित्रपटांची निवड केली आहे. हे चित्रपट महाराष्ट्रातील ३० शहरासह कर्नाटक, गोवा, गुजरात या ठिकाणी दाखविले जाणार आहेत.

या महोत्सवात ८ मार्चला भारतीय समाजामध्ये होणाऱ्या स्त्री अत्याचार, पुरुषी दमनशाही आदींवर प्रकाश टाकणारा ‘मिर्च मसाला’ हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. त्यानंतर दर रविवारी सायंकाळी चार वाजता वेगवेगळे चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. यामध्ये एरिन ब्रोकोविच ( स्टीव्हन स्लीप बर्ग- अमेरिका ), मंथन (श्‍याम बेनेगल) या भारतीय चित्रपटाशिवाय ’इन्हीकटस’ (क्‍लिंट इस्टवूड- अमेरिका), ’मुलादे’ ( उस्मान सेम्बेन- केनिया), अक्वारीस (क्‍लेबर फिलो-ब्राझील), द फर्स्ट ग्रेडर (जस्टिन चाडविक - केनिया),द इमिटेशन गेम (मोर्टन तायडम यू अस ए ) मेड इन डोगनाम ( निगेल कोल यूके)  आदी चित्रपट दाखविले जाणार आहेत. प्रत्येक चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटाचा विषय, आशय, महिला सक्षमीकरण आणि प्रत्येकाची भूमिका या विषयावर उपस्थित सिनेरसिक, विद्यार्थी, युवक-युवती यांच्यामध्ये चर्चेचे आयोजन केले जाणार आहे. 

या चित्रपट महोत्सवाला रत्नागिरीकर ,सिनेप्रेमी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा, असे आवाहन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. हेगशेट्ये व महाविद्यालयाचे प्राचार्य सुकुमार शिंदे यानी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT