Barsu Refinery  sakal
कोकण

Barsu Refinery : बारसू रिफायनरी विरोधातील जनआंदोलनाला ‘दक्षिणायन’चा पाठिंबा

ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील ज्येष्ठ लेखक-कवी, पत्रकार व कलाकारांनी आंदोलनाला पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी स्थानिक जनतेने उभ्या केलेल्या आंदोलनाला ‘दक्षिणायन’ चळवळीने पाठिंबा दिला आहे. ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील ज्येष्ठ लेखक-कवी, पत्रकार व कलाकारांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

यामध्ये महेश एलकुंचवार, डॉ. रावसाहेब कसबे, यशवंत मनोहर, प्रभा गणोरकर, वसंत आबाजी डहाके, प्रज्ञा दया पवार, छाया दातार आदी सुमारे चाळीस ज्येष्ठ लेखक-कवी-नाटककारांचा समावेश आहे.

दक्षिणायन महाराष्ट्राचे निमंत्रक संदेश भंडारे आणि प्रमोद मुनघाटे यांनी याबाबतचे पत्रक जाहीर केले आहे. ‘कोकण हा पृथ्वीवरील, औद्योगिकरणाच्या कचाट्यातून अजूनही बऱ्याच प्रमाणात वाचलेला, जैविक विविधतेने मानवी अस्तित्वासाठी आवश्यक अशा पर्यावरणाचा ठेवा आहे.

म्हणून तेथील सर्वसामान्य लोकांनी आजवर येऊ घातलेल्या प्रदूषणकारी प्रकल्पाला प्राण पणाला लावून विरोध केला आहे. या कल्पाचे समर्थन तथाकथित विकासाचे कारण दाखवून केले जात आहे. परंतु साम्राज्यवादी शक्तींचा यामागील स्वार्थी व विनाशकारी हेतू ग्रामस्थांना समजावून सांगण्याची गरज आहे. यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी नेटाने आंदोलन चालविले आहे. या आंदोलनाला बळ देण्याची गरज आहे’, असे या पत्रकात म्हटले आहे.

ग्रामस्थांचा प्रखर विरोध आहे. हा विरोध घटनात्मक पध्दतीने स्वातंत्र्यदिनी किंवा प्रजासत्ताकदिनी ग्रामसभांमधे रितसर ठराव मंजूर करून व ते सरकारला सर्व स्तरावर देऊन व्यक्त झाला आहे. या प्रकल्पामुळे फक्त कोकणातील काही गावे बाधित नाहीत, तर मानवजात व जीवसृष्टी बाधित आहे. रिफायनरी प्रकल्प हा मानवजात व जीवनाशी द्रोह ठरेल, हत्येचा गुन्हा ठरेल. बारसू येथील रिफायनरी प्रकल्प तात्काळ रद्द व्हायला हवा, अशी मागणीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT