Danger Level Exceeded By Jagbudi River Ratnagiri Marathi News  
कोकण

सावधान ! जगबुडीने ओलांडली धोक्‍याची पातळी 

सकाळवृत्तसेवा

खेड ( रत्नागिरी ) - खेड शहरालगत वाहणाच्या जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्यांनी धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. नगरपालिका प्रशासनाने व्यापारी आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

गेले चार दिवस तालुक्‍यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. जगबुडी नदीची इशारा पातळी 6.50 तर धोक्‍याची पातळी 7 मीटर इतकी आहे. रविवारी (ता. 16) रात्री जगबुडी इशारा पातळीवर वहात होती.

आज दुपारी जगबुडीने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने खेड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. जगबुडीप्रमाणे नारिंगी नदीचे पाणीही क्षणाक्षणाला वाढत आहे. त्यामुळे खेडची बाजारपेठ कधीही पाण्याखाली जाण्याची शक्‍यता आहे. नारिंगी नदीकाठी असलेली भातशेती पाण्याखाली गेली, की या नदीचे पाणी दापोली नाका येथून बाजारात भरायला सुरवात होते.

जगबुडी नदीचे पाणी मटण मार्केट येथून बाजारपेठेकडे उसळी मारते. गेले चार दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्‍यातील नातुवाडी, शिरवली, पिंपळवाडी, शेलारवाडी आणि तळवट या पाचही धरणामध्ये पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला आहे. धरणातून सोडले जाणारे पाणी जगबुडी नदीला मिळत असल्याने जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी क्षणाक्षणाला वाढू लागली आहे. हे पाणी कधीही बाजारपेठेत घुसण्याची शक्‍यता असल्याने व्यापारी आणि शहरातील नागरिकांची चिंता वाढली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

iPhone 18 Pro: Apple चा 'Surprise and Shine' इव्हेंट आज! पहिला फोल्डेबल फोन येणार? जाणून घ्या कधी अन् कुठे पाहायचा LIVE

SCROLL FOR NEXT