कोकण

दापोली आगार तोट्यात जाण्यासाठी प्रयत्न

CD

३० (पान ४ साठी)

(एसटीचे चित्र वापरावे)

दापोली आगार तोट्यात नेण्याचा प्रयत्न

मंगेश मोरे ः प्रवाशांची गैरसोय, अन्यथा आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा ः
दाभोळ, ता. १६ : दापोली बस स्थानकातून लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या एसटी बसेसना समांतर बसेस अन्य आगारातून सुरू करून फायद्यात असणारा दापोली आगार तोट्यात कसा येईल यासाठी एसटीच्या वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये दापोलीत असणारा प्रवासी वर्ग भरडला जात असून याप्रकरणी एसटीच्या अधिकाऱ्यांनी योग्य दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दापोली तालुका प्रवासी मित्र संघटनेचे अध्यक्ष मंगेश मोरे यांनी दिला आहे.
नांदेड, धाराशिव, लातूर, बीड, सोलापूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील अनेक कर्मचारी हे दापोलीमध्ये शासकीय नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. या आगारातील बसेसना चिपळूण, खेड या आगारातून समांतर वाहतूक सुरू करून दापोली आगारातून फायद्यात असणारी सेवा बंद करण्यास भाग पाडले जाते. दापोली आगारातून काही वर्षांपूर्वी दुपारी ११.३० वाजता दापोली-कोल्हापूर ही बस सुरू होती. ही बस कोल्हापूरवरून रात्री १० वाजता सुटत होती. फायद्यात असणाऱ्या या बसच्या काही वेळ आधी खेड आगारातून सकाळी ११.३० वाजता सुटणारी खेड-कोल्हापूर व कोल्हापूरवरून रात्री ९.३० वाजता सुटणारी कोल्हापूर-खेड ही बस सुरू करण्यात आली. त्यामुळे दापोलीतून सुटणारी फेरी बंद झाली. दापोली-परळी ही बसफेरी सकाळी ५.१५ वाजता सुटत होती. ही बस चिपळूणला ७ वाजता जात असे. याचवेळी चिपळूण आगारातूनही परळी मार्गावर बसफेरी सुरू झाली व दापोली आगाराची फेरी बंद करण्यात आली.
दापोली आगारातून सकाळी ९ वाजता सुटणारी दापोली-अक्कलकोट या फेरीपूर्वी खेड आगारातून सकाळी ९ वाजता खेड-लातूर अशी फेरी सुरू करण्यात आली. असाच प्रकार दापोली आगारातून सकाळी ७.४५ वाजता व रात्री ९ वाजता सुटणाऱ्या दापोली-पिंपरी चिंचवड या फेरीबाबतही करण्यात आला. या फेऱ्यांपूर्वी खेडमधून पिंपरी-चिंचवड मार्गावर फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. दापोली आगारातून सुटणाऱ्या दापोली-गणपतीपुळे फेरीच्या वेळेत चिपळूण आगारातून चिपळूण-गणपतीपुळे ही बस सुरू करण्यात आली आहे. सकाळी ६ वाजता सुटणाऱ्या दापोली-रत्नागिरी या फेरीच्या समांतर खेड आगारातून खेड- रत्नागिरी ही बस सुरू करण्यात आली. याबाबत आमदार योगेश कदम यांना निवेदन देण्यात आले आहे. एसटीच्या अधिकाऱ्यांनी योग्य कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्व जबाबदारी रत्नागिरीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांची असेल असेही मंगेश मोरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra: आधार आणि किसान आयडी ब्लॉक, सरकारी योजनांपासून दूर ठेवणार अन्...; शेतरस्त्यावर अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई होणार

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार केले, नंतर...; धक्कादायक कृत्याने खळबळ, काय घडलं?

Gas Cylinder Shortage : कुंपणच शेत खातेय! हॉटेल सुरू, पण घरगुती गॅस टंचाई; नागरिकांचा संताप टोकाला, बुकिंग करूनही प्रतीक्षा

Food Poisioning : शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ४५ विद्यार्थिनींना विषबाधा; सर्व विद्यार्थिनीं धोक्याबाहेर

मृत्यू समोर उभा…पण टीसी देवदूत ठरला; प्रवाशाचा 3 सेकंदात जीव वाचला, रेल्वे स्थानकावर थरारक प्रसंग, पाहा Video

SCROLL FOR NEXT