Ramdas Kadam,Surykant Dalvi Esakal
कोकण

शिवसेनेत पडतेय उभी फूट; रामदास कदम-सूर्यकांत दळवी संघर्ष पेटणार

नव्या राजकीय वादाला तोंड फोडल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत

राधेश लिंगायत

हर्णै : दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या (Dapoli Nagerpanchayt Election) पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam)आणि सूर्यकांत दळवी (Surykant Dalvi) यांच्यातील छुपा राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आला असून त्यांच्यातील राजकीय अहममिकेमुळे दापोली शिवसेनेत उभी फूट पडल्याचे दिसत आहे. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam)यांच्याबाबतच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर दापोलीच्या राजकीय परिस्थितीने 'यू टर्न' घेतला असून पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सेनेची हंगामी तालुका कार्यकारिणी जाहीर करून नव्या राजकीय वादाला तोंड फोडल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

अनिल परब यांनी सेनेची हंगामी तालुका कार्यकारिणी जाहीर करून नव्या राजकीय वादाला तोंड फोडल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

सध्या दापोली शहरात नगरपंचायत निवडणुकीमुळे राजकीय धुरळा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि काँग्रेस पक्षांमध्ये आघाडी केल्याचे आमदार योगेश कदम यांनी जाहीर करून नगरपंचायत निवडणुकीची सूत्रे आपल्या हाती असल्याचे संकेत दिले होते. साहजिकच त्या दृष्टीने उमेदवार चाचपणी व बांधणी करण्याबाबतची कार्यवाही सुरू झाली होती.

दरम्यान, योगेश कदम यांच्याशी राजकीय सख्य नसलेली काही मंडळी राष्ट्रवादीचे घड्याळ आपल्या हाती बांधून राजकीय उलथापालथ करण्याच्या तयारीत होते. तत्पूर्वी, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख संदीप राजपुरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून सेनेला राजकीय धक्के देण्यास सुरुवात केली होती.

संघर्ष ईर्ष्येला पेटणार

सेनेतील नाराज गटाचे एक संचालक मंडळ जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना जाऊन भेटल्यानंतर दापोलीच्या शिवसेनेमध्ये उलथापालथ होणार असल्याची जोरदार चर्चा होती. अनिल परब यांनी दापोली दौऱ्यावर येऊन हंगामी कार्यकारिणी निर्माण केल्याने रामदास कदम विरुद्ध सूर्यकांत दळवी असा संघर्ष ईर्ष्येला पेटणार आहे. त्यातच शिवसेना राष्ट्रवादीची आघाडी झाल्याने विद्यमान आमदार योगेश कदम यांची येत्या काळात कशी राजकीय भूमिका असणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राजकीय स्थित्यंतराचे संकेत

सध्या तरी दापोलीतील शिवसेना ही कदम व दळवी अशा दोन गटांमध्ये विभागल्याचे चित्र असून या परिस्थितीमुळे सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दापोलीतील नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक महत्त्‍वाकांक्षेपोटी होत असलेल्या राजकीय स्थित्यंतरामुळे शहरातील वातावरण कमालीचे तापलेले आहे. निवडणूक जिंकल्यानंतर कोणाचे राजकीय वजन वाढणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Uruli Kanchan Fraud News : प्लॉट विकत देतो म्हणून बुकिंग पोटी ५ लाख घेतले, खरेदीखत न करता फसवणुक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावे घरकूल घोटाळा, जलील यांचा आरोप

Team India Cricket Schedule: २० वन डे, २१ ट्वेंटी-२०, १० कसोटी अन् Asian Games; भारताचे पुढील १२ महिन्यांचे क्रिकेट कॅलेंडर

SCROLL FOR NEXT