dapoli spot Destination of filming ratnagiri
dapoli spot Destination of filming ratnagiri 
कोकण

कोकणात आहे ३५० वर्षे जुने व पारंपरिक घर जे ठरतेय चित्रीकरणाचे डेस्टिनेशन

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ : कोविडच्या प्रभावानंतर आता कोकणातही दूरचित्रवाहिन्यांच्या मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले. सध्या लाडघर, कर्दे व मुरूड परिसर चित्रीकरणाचे डेस्टिनेशन ठरले आहे. मालिकेच्या चित्रीकरणामुळे आता दापोली तालुक्‍यात अन्य मालिकांचेही चित्रीकरण होण्यास चालना मिळेल. 


एका खासगी वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतील काही भागांचे चित्रीकरण दापोली तालुक्‍यातील लाडघर, कर्दे व मुरूड येथे सुरू आहे. मुख्य चित्रीकरण कर्दे येथील माने यांच्या ३५० वर्षे जुन्या व पारंपरिक घरात केले जात असल्याची माहिती या मालिकेचे लेखक व निर्माता सुबोध खानोलकर यांनी पत्रकारांना दिली. मालिकेतील तीन कलाकारांनीही पत्रकारांशी संवाद साधला. या मालिकेतील ब्रह्मे कुटुंबाचे मूळ घर कोकणातील दापोली असल्याचे दाखविले आहे.

एक गाणेही या निसर्गसंपन्न वातावरणात चित्रीत होईल. दापोलीतील कर्दे व मुरूड येथे चित्रीत होत असलेल्या भागांमध्ये तीन मुख्य कलाकार वगळता सर्व कलाकार हे स्थानिक आहेत. 
त्यात ऋषीकेश बाळ, सुप्रिया गाडगीळ, साईराज माने, वर्षा पाते, कुंदन जाडे यांचा समावेश आहे. दापोली आणि परिसरातील स्थानिकांचे मोलाचे सहकार्य या चित्रीकरणासाठी मिळाल्याचे खानोलकर यांनी सांगितले. लाडघर येथील श्री दत्त मंदिर येथेही चित्रीकरण केले आहे. सानिका गाडगीळ, गौतमी देशपांडे, विराजस कुलकर्णी हे कलाकार येथे आले आहेत. 

समुद्रकिनारा आवडला
दापोलीविषयी विराजस आणि गौतमी म्हणाले, की आम्हाला कर्दे व मुरूड तसेच लाडघर येथील समुद्रकिनारा खूपच आवडला. मालिकेतील ब्रह्मे कुटुंबाचे मूळ गाव दापोली असल्याचे आम्ही ऐकत आलो. प्रत्यक्षात येथे आल्यावर ही गावे, येथील अथांग समुद्र आम्हाला खूप आवडला. आम्ही या गावात प्रथमच आलो आहोत.

कर्दे व मुरूड भागात शहरीकरणाचे प्रमाण खूप कमी आहे. आम्हाला चित्रीकरणासाठी आवश्‍यक गाव, येथील घरे तसेच येथील चांगले स्थानिक कलाकार मिळाले. येथील जेवणही आम्हाला खूप आवडले आहे.
-सुबोध खानोलकर

 संपादन- अर्चना बनगे
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT