Deaf Doctor Girl Nivedita Barve Success Story  
कोकण

डॉक्‍टर मुलगी आहे `अशी` असे सांगितले, अन्‌ झाला टाळ्यांचा कडकडाट 

शिरीष दामले

रत्नागिरी - नायजेरियात एका कॉन्फरन्समध्ये असताना फोन आला, मी तो घेतला. पलिकडून मुलगी निवेदिता म्हणाली, ""बाबा मी डॉक्‍टर झाले.'' बाजूला येऊन बसलो आणि डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. साऱ्यांना प्रश्‍न पडला, डॉक्‍टर होणे यात विशेष नव्हते. ती कर्णबधिर आहे सांगितल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. हा किस्सा सांगताना सुधीर बर्वे यांचा उर अभिमानाने भरून आला होता. 

कर्णबधिर मुलीला लहानपणापासून वाढवणे हे आमच्यासाठी आव्हान होते. भावनिक, शारीरिक तसेच काहीवेळा आर्थिक ताणही सोसावे लागले. मात्र तिला सामान्य मुलांप्रमाणेच वाढवायचे. कर्णबधिरतेचा बाऊ करायचा नाही. तिचे स्वतंत्र व्यक्तीमत्व घडवायचे ठरवून आम्ही आणि मोठी बहीण यांनी तिला सपोर्ट सिस्टम म्हणून काम केले. तिला कधीही दुबळी बनू दिले नाही, असे सुधीर आणि सुप्रिया बर्वे यांनी सांगितले. 

राजस्थानात तिला एकटी पाठवली आणि स्वतंत्र व्यक्ती म्हणून ती खंबीर झाली. राजस्थानातील लोक अधिक कनवाळू आहेत. त्यामुळे वेळीअवेळी प्राण्यांना ते आणत. त्यांच्यावर उपचार करण्याचे आव्हान तिने पेलले. एमपीएससी परीक्षा देऊन ती चिपळुणात सरकारी खात्यात आली. त्याबाहेर येथेही भटक्‍या कुत्र्यांची सेवा ती करते. चिपळुणातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या रस्त्यावर जखमी कुत्र्यावर तिने तेथेच उपचार केलेले अनेकांनी पाहिले आहे. यावर निवेदिता म्हणाल्या, चिपळुणात भटक्‍या जनावरांसाठी काम करणारी संस्था उभी राहिली तर त्यांच्यासाठी मी मोफत काम करीन. दोन-तीनजण व्यक्तीगत पातळीवर भटक्‍या जखमी जनावरांना घेऊन येतात; मात्र संस्थात्मक काम नाही. 

मोबाईल व्हॅन कार्यरत व्हाव्यात 

चिपळुणातील जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अद्ययावत होते. मात्र पुरामध्ये त्याची हानी झाली आहे. तरीसुद्धा सामान्य शेतकरी, पशुधन पाळणारे गरीब लोक प्राण्यांना घेऊन येतात. डॉक्‍टर प्राण्यांच्या दारापर्यंत जाण्यासाठी मोबाईल व्हॅन आहे. सध्या ती कार्यरत नाही. त्या उपलब्ध झाल्या तर उपचार करणे सोपे जाईल, असे निवेदिताने सांगितले. 

जखमी पिल्लावर कौशल्याने शस्त्रक्रिया 

कुत्र्याच्या रॉटवॉयलर जातीचे 28 दिवसांचे पिल्लू मोठ्या कुत्र्याने फाडले होते. त्याला सावर्डेतून मालक घेऊन आले. डॉ. निवेदिताने रक्तस्राव होत असतानाही धोका पत्करून अत्यंत कौशल्याने शस्त्रक्रिया केली. मरणासन्न अवस्थेतील ते पिल्लू थोड्याच वेळात टुणकन उडी मारून टेबलावर खेळू लागले. त्यानंतर ते दवाखान्यात येते तेव्हा तिच्या खांद्यापर्यंत नाचून तिचा चेहरा चाटून कृतज्ञता व्यक्त करते. 
(समाप्त)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT