death of the daughter also shocked the father basni village ratnagiri marathi news 
कोकण

क्रूर नियती! लग्नाच्या ताेंडावर काळाचा घाला, लेकीने साेडला बापाच्या खांद्यावर जीव; धक्क्याने बापाचाही मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी :  वर्षभरापासून घरीच देखभाल करताना मुलीच्या काळजीने पित्याचा जीव सारखा तुटत होता. पोटच्या मुलीला होणाऱ्या वेदना, त्रास पाहून काळजाला घरे पडत होती. नियतीच्या मनात काही वेगळेच होते. कन्येचा मृत्यू डोळ्यासमोर पाहिल्यानंतर तो धक्का सहन न झाल्यामुळे पित्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. १) घडली. बाप-लेकीवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ कदम कुटुंबीयांवर आली.


मूळचे बसणी येथील नंदकुमार कदम जिल्हा परिषदेत आरोग्य विभागात सहाय्यक लेखाधिकारी म्हणून कार्यरत होते. जवळपास २५ वर्ष जिल्हा परिषदेत विविध विभागात ते कार्यरत होते. नियतीने त्यांच्या कुटुंबावर एक प्रकारे घालाच घातला आहे. त्यांची मोठी मुलगी प्राजक्ता (वय २८) शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक खासगी नोकरी करत होती. तिचे लग्नही ठरलं होते. घरात आनंदाचे वातावरण होते. हा आनंद फारवेळ टिकला नाही. वर्षांपूर्वी प्राजक्ता आजारी पडली. तपासणीअंती तिला कॅन्सर झाल्याचे स्पष्ट झाले. कुटुंब अक्षरश: हादरून गेले होते. या परिस्थितीतही न डगमगता प्राजक्तावर उपचार सुरू झाले.

नंदकुमार कदम हे उपचारासाठी धडपडत होते. गेले वर्षभर ते अनेक वेळा रजा टाकून तिच्या उपचारासाठी जात होते. प्राजक्ता हळूहळू बरी होत होती. मात्र, नियतीला ही गोष्ट मान्य नव्हती. दोन दिवसांपूर्वी घरात अचानक तिला फिट आली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या नंदकुमार कदम यांनी तिला उपचारासाठी डॉक्‍टरांकडे नेण्यासाठी हालचाल सुरू केली. त्यांच्या हातावरच तिने अखेरचा श्वास घेतला. तिचा मृत्यू त्यांच्या डोळ्यासमोर झाला. लाडक्‍या कन्येचा मृत्यू पाहिल्याचा धक्का नंदकुमार कदम यांना इतका बसला की, ते जाग्यावरच खाली कोसळले. डॉक्‍टरांकडे उपचारासाठी त्यांना नेले. तिथे त्यांचा मृत्यू झाला. बाप-लेकीच्या मृत्यूनंतर जि.प. भवन तसेच बसणी गावावर शोककळा पसरली.

शोकांतिका..

 मोठी मुलगी प्राजक्ताचा ठरला होता विवाह
 वर्षांपूर्वी पडली प्राजक्ता आजारी 
 तपासणीअंती तिला कॅन्सर झाल्याचे निदान
 न डगमगता प्राजक्तावर उपचार होते सुरू
 दोन दिवसांपूर्वी घरात अचानक आली फिट
 नंदकुमार कदम यांच्या हातावरच 
  घेतला अखेरचा श्वास

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT