Decision to ban Marathi or Hindi item song at an annual affair held at Zilla Parishad schools in ratngagiri  
कोकण

आता मराठी शाळेत वाजणार नाही आयटम सॉंग....

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी -  जिल्हा परिषद शाळांत आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनात मराठी किंवा हिंदी आयटम साँगला बंदी घालण्याचा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी घेतला आहे. तशा सूचना सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. 
 महाराष्ट्रातील कला संस्कृती अबाधित रहावी यासाठी हा अनोखा निर्णय घेण्यात आल्याचे बने यांनी सांगितले. हा निर्णय अडीच हजार शाळांसाठी लागू करण्यात आला आहे.

निर्णय सर्व शाळेत राबवण्याच्या सूचना

शाळेच्या चालू शैक्षणिक वार्षिक नियोजनात,कोणत्याही समारंभात हिंदी किंवा मराठी आयटम साँगवर नाचण्यास विद्यार्थ्याना परवानगी असणार नाही. या निर्णयाचे पालक आणि शिक्षकांनी सुद्धा स्वागत केलं आहे. या आगळ्यावेगळ्या निर्णयाने रत्नागिरी जिल्हा परिषदेची चर्चा राज्यात सुरू आहे.
शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी श्री.बने प्रमुख अतिथी म्हणून गेले होते. लहान वयात मुलांवर चांगले संस्कार होणे आवश्यक असल्याचे त्यावेळी त्यांना प्रकर्षाने जाणवले.

निर्णय नाही पाळला तर कार्यवाही करा

 त्यानंतर त्वरित जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यावर विचार विनिमय केला. तसेच आयटम सॉंग वर बंदी घालण्याचा निर्णय सर्व शाळेत राबवण्याच्या सूचना दिल्या. याची अमलबजावणी त्वरित करा असेही शिक्षणाधिकाऱ्या ना सूचित केले आहे.शिक्षणाधिकारी निशा वाघमोडे यांनी तत्काळ नोटीस काढून अडीच हजार शाळेत याची कार्यवाही करा अशा सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Corruption News : पैसा डबल करण्याच्या आमिषाला पोलिसही बळी; एसपींच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांची नावे समोर, घटनेने खळबळ

Manikrao Kokate: १९९६ चा खटला… दिवंगत बापासाठी मुलगी लढली अन् न्याय मिळून दिला, माणिकराव कोकाटेंविरोधात लढलेल्या ॲड. अंजली दिघोळे...

VIDEO : 'गावातील अंबानी शेतकऱ्याचं घर'! 20 एकरातील आलिशान घर पाहून नेटकरीही थक्क; गाड्यांपासून घोड्यांपर्यंत सर्व काही इथे आहे...

Viral Video: किती गोड! आजोबांनी रेल्वेत आजीसाठी केलं असं काही... व्हायरल व्हिडिओ पाहून आनंदाश्रू उभे राहतील

'त्याने माझे खराब व्हिडिओ पोस्ट केले होते' सोशल मीडियाचा अनुभव सांगताना प्राजक्ता माळी म्हणाली...

SCROLL FOR NEXT