Medical College Recognition Cancelled

 
esakal
कोकण

अवघ्या 48 तासांतच निर्णय फिरला; सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची मान्यता रद्द

मेडिकल कॉलेजच्या मान्यतेबाबत मोठा यू-टर्न; प्रवेश प्रक्रियेवर अनिश्चिततेचे सावट.

शिवप्रसाद देसाई

सिंधुदुर्गात जनरेटा उभारल्यावर मंजूर झालेल्या या महाविद्यालयाचे भवितव्य पुन्हा अधांतरी झाले आहे.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नॅशनल मेडिकल कमिशनकडून मिळालेली मान्यता अवघ्या ४८ तासांच्या आत अचानक रद्द करण्यात आली आहे. (Konkan news) प्रस्तावात त्रुटी काढून त्याच्या पूर्ततेसाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. आधी मंजूर झालेल्या प्रस्तावात नंतर कशा त्रुटी निर्माण झाल्या, हा प्रश्न निर्माण झाला आहे. (konkan Update) सिंधुदुर्गात जनरेटा उभारल्यावर मंजूर झालेल्या या महाविद्यालयाचे भवितव्य पुन्हा अधांतरी झाले आहे. (Sindhudurg medical college permission cancelled)

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजला केंद्राच्या मान्यतेसाठी जुलैमध्ये केंद्रीय समितीने पाहणी दौरा केला होता. त्यानंतर राज्यातील अन्य तीन मेडिकल कॉलेजला परवानगी दिली होती; परंतु सिंधुदुर्गला मिळाली नव्हती. सोमवारी ती मिळाली, अशी घोपणा खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांनी केली होती. यामुळे या वर्षात या महाविद्यालयात १०० विद्यार्थ्यांची पहिली बॅच सुरू होणार होती. या कॉलेजमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टरांची टंचाई कमी होऊन जिल्हा वैद्यकीय क्षेत्रात स्वावलंबी होणार होता.

यात अचानक वेगळीच घडामोड घडली आहे. केंद्र स्तरावरील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता प्रस्ताव मंजुरीच्या ४८ तासांच्या आत रद्द केला आहे. याबाबत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगा(एन. एम. सी.) ने सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाताना पत्र पाठवल आहे. यात मान्यता नाकारल्याचे म्हटले आहे. यात काही त्रुटींचा उल्लेख आहे. यात अध्यापक वर्ग तसेच रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे म्हटले आहे.

पुरेशा यंत्रसामुग्रीसह प्रयोगशाळेची कमतरता, वाचनालयात पुस्तके व इतर साहित्याची कमतरता, परीक्षा कक्षाची अनुपलब्धता आदींचा त्रुटीत उल्लेख आहे. याची तीन आठवड्यात पूर्तता करून अहवाल आयोगाला सादर करायचा आहे. यानंतर पुन्हा समिती प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. नंतरच मान्यतेवर निर्णय होणार असल्याचे आयोगाने सूचित केले आहे.

तर प्रवेश रखडणार

मान्यता मिळाली असती तर या वर्षी १०० विद्यार्थ्यांची पहिली बॅच सुरू होणार होती. शिवाय तज्ज्ञ डॉक्टर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना उपलब्ध होणार होते. आता तीन आठवड्यात त्रुटींची पूर्तता न झाल्यास यंदाचे प्रवेश रखडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT