Decision on university examination only after guidance of UGC kokan marathi news 
कोकण

युजीसीच्या मार्गदर्शनानंतरच विद्यापीठांच्या परिक्षांविषयी निर्णय ; उदय सामंत

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी  : विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन घेणेकरीता युजिसीचे मार्गदर्शन आल्यानंतरच निर्णय घ्यावा अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. श्री. सामंत यांनी आज व्हिडीओ कॉन्फर्न्सच्या माध्यमातून राज्यातील सर्व अकृषि विद्यापिठाच्या कुलुगुरूंशी चर्चा केली. यावेळी शिक्षण सचिव सैारभ विजय यांच्या सह उच्च शिक्षण संचालक व सर्व अकृषि विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते. 
    युजीसीच्या मार्गदर्शन सुचनांनंतर परिक्षांचे वेळापत्रक तयार करावे असे सांगून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, ऑनलाईन परिक्षा घेण्याबाबत सर्वांना विचारात घेऊनच निर्णय घ्यावा लागेल. तसेच सध्या विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन परिक्षांविषयी संभ्रमावस्था आहे. ती दूर करण्याच्या दृष्टीने सर्व कुलगुरूंनी आपल्या स्तरावर युजीसीच्या मार्गदर्शक सुचनांनंतर परिक्षा कशा पद्धतीने घ्यायचा याचा निर्णय घेण्यात येईल याविषयी प्रसिद्दी करावी. या मार्गदर्शक सुचनांसोबतच सध्या राज्य स्तरीय समितीने तयार केलेला आराखडा यांची योग्य ती सांगड घालून परिक्षांचे वेळापत्रक व पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन करावे. ऑनलाईन परिक्षा घेण्याविषयी काही अडचणी असल्यामुळे शक्यतो ऑफलाईन परिक्षा घेण्याच्या दृष्टीने विद्यापिठांनी तयारी करावी.

परिक्षा जरी ऑनलाईन होणार नसल्या तरी ऑनलाईन टिचींगची सर्व तयारी विद्यापिठींनी त्यांच्या स्तरावर करावी. यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा पुरवता येतील. ऑनलाईन परिक्षा नाही तर ऑनलाईन शिक्षणाविषयी आपल्याला निर्णय घ्यावयाचा आहे. ज्या विद्यापिठांचा अभ्यासक्रम 70 टक्के पेक्षा जास्त पूर्ण झाला आहे. त्यांनी परिक्षांसाठी पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमाचा समावेश करावा व उर्वरीत अभ्यासक्रम पुढील परिक्षेमध्ये समाविष्ट करावा. मुंबई आणि पुण्याच्या परिस्थितीवर राज्यातील परिक्षांचा विचार करता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यापिठाने त्यांच्याकडील परिस्थितीनुसार निर्णय घ्यावेत अशा सूचना श्री. सामंत यांनी यावेळी दिल्या.


विद्यापिठांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक मदत करावी
 सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापिठांनी भरिव आर्थिक सहाय्य करून राज्य सरकारचे हात मजबूत करावेत असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व अकृषि विद्यापीठांच्या कुलगुरूंना केली. सदरची मदत ही विद्यापीठांकडे असलेल्या आपत्कालिन निधीमधून करावी अशी सूचना ही त्यांनी केली. याविषयी पुण्याचे एस.एन.डी.टी व कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ यांनी एक कोटी पेक्षा जास्त मदत करण्यास मान्यता दर्शवली आहे. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस केलेल्या 10 कोटी रुपयांच्या आर्थिक सहाय्याबद्दल त्यांचे आभार मानले व आभिनंदन ही केले. 

विद्यापिठांमध्ये तपासणी लॅब 
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी आपत्कालिन निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्याविषयी परवानगीची नियमावली तपासावी अशा सूचना केल्या. तसेच युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनंतर परीक्षांविषयी निर्णय घेताना लॉकडाऊन ज्या जिल्ह्यांमध्ये उठेल तिथे परीक्षा घेणे कशा पद्धतीने शक्य आहे याचा अहवाल करावा, जीवन रक्षक कोर्स तयार करावा, जेणे करून आपत्कालीन परिस्थितीमध्ये या कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांचा उपयोग समाजास होईल. विद्यापिठांमध्ये तपासणी लॅब तयार करण्याविषयी कार्यवाही करावी. नांदेडमध्ये सध्या लॅब सुरू असून त्याठिकाणी टेस्ट ही केल्या जात आहेत. अशाच प्रकारे सर्व विद्यापीठांनी लॅब सुरू करावेत, त्यासाठी लागणारी केंद्राची परवानगी लगेच घेण्यात येईल.

लॉकडाऊनचा काळ वार्षिक सुट्ट्यांमध्ये

लॉकडाऊनचा काळ हा वार्षिक सुट्ट्यांमध्ये धरावा व याविषयी प्रत्येक विद्यापीठाने एकवाक्यता ठेवावी. ऑनलाईन शिक्षणासाठी चांगल्या पद्धतीने करण्याविषयी कार्यवाही करावी अशा सूचना श्री. सामंत यांनी केले. यावेळी सर्व कुलगुरूंनी ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा, शैक्षणिक वर्ष, अभ्यासक्रम याविषयी त्यांचे मत मांडले. तसेच ऑनलाईन परिक्षा घ्यावयाच्या झाल्यास सर्व विद्यार्थ्यांना सुविधा पुरवता येतील का याविषयीही भूमिका स्पष्ट केली. शेवटी राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी सर्व विद्यापिठांनी त्यांची तयारी करावी व त्याचा आहवाल सचिवांकडे सादर करावा, त्यावर मुख्यमंत्री मोहोदय यांच्याशी चर्चा करून तातडीने निर्णय घेऊ असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT