Decrease in livestock in Rajapur taluka  
कोकण

 राजापूर तालुक्‍यात पशुधनामध्ये घट 

सकाळवृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी ) - पंचायत समितीच्या पशुविभागाद्वारे तालुक्‍यामध्ये विसावी पशुगणना करण्यात आली. त्यामध्ये विस्तारलेली गावे आणि "डोअर टु डोअर' सर्व्हेक्षण करण्याचे आव्हान असतानाही विसावी पशुगणनेचे काम पूर्ण करण्यात पशुविभागाला यश आले आहे. 2012 मध्ये झालेल्या 19 व्या पशुगणनेमध्ये 1 लाख 53 हजार 106 तर, 2020 मध्ये 20 व्या पशुगणनेमध्ये 1 लाख 51 हजार 879 एवढी पशु-पक्ष्यांची नोंद झाली आहे. तालुक्‍याच्या 19 व्या पशुगणनेच्या तुलनेमध्ये 20 व्या पशुगणनेमध्ये पशु - पक्ष्यांची 1 हजार 227 ने घट झाली आहे. 

दर पाच वर्षानंतर पशुगणना केली जाते. मात्र, 2012 मध्ये झालेल्या एकोणीसाव्या पशुगणनेनंतर दोन वर्ष पशुगणना झाली नसल्याने रखडलेली ही विसावी पशुगणना गतवर्षी करण्यात आली. त्यामध्ये तालुक्‍यातील 101 ग्रामपंचायती आणि 238 महसूल गवांमध्ये सोळा पशुधन पर्यवेक्षक आणि सहकाऱ्यांमार्फत ही पशुगणना करण्यात आली. तालुक्‍यातील विस्तारलेली गावांमध्ये "डोअर टु डोअर' विविध मुद्‌द्‌यान्वये पशुधन पर्यवेक्षकांमार्फत टॅबच्या सहाय्याने ऑनलाईन पशुगणना करण्यात आली. रेंजचा प्रश्‍न असतानाही विसाव्या पशुगणनेचे काम पूर्ण करण्यात यश आले आहे. 

पशुगणनेमध्ये तालुक्‍यामध्ये 1 लाख 51 हजार 879 एवढी पशु - पक्ष्यांची नोंद झाली आहे. त्यामध्ये गतवेळच्या तुलनेमध्ये यावेळी कोंबड्यांची संख्या लक्षणीय घटल्याचे चित्र दिसत आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम होवून 19 व्या झालेल्या पशुगणनेच्या तुलनेमध्ये विसाव्या पशुगणनेमध्ये तालुक्‍यातील 1 हजार 227 ने पशु-पक्ष्यांची घट झाल्याची नोंद झाली आहे. मांस - मटण खाण्यासाठी कापल्या जात असलेल्या कोंबड्यांमुळे ही संख्या घटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

दृष्टीक्षेपात पशुगणना 
                  2012...... 2020 
गाय......... 46760......46559 
म्हैस....... 6300........ 6279 
शेळ्या..... 4343........ 4345 
कुक्कुटपालन 95703... 94696 
एकूण .........153,106 ....151879 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: मुंबईकडून घरच्या मैदानात विजयाचा श्रीगणेशा? आज KKR विरुद्ध सामना; जाणून घ्या संभावित Playing XI

Pune News: बाणेर रस्त्यावर अडथळ्यांची शर्यत!; खोदलेले रस्ते, पदपथ दुरुस्तीकडे दुर्लक्ष; ठिकठिकाणी माती अन् राडारोडा

Pune Crime:पुण्यात डिलिव्हरी बॉयकडून वसतिगृहात अश्लील वर्तन; धक्कादायक प्रकार, परदेशी विद्यार्थिनींची सुरक्षा चव्हाट्यावर

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर गोळीबारचा थरार, तरूणाने स्वत:वरच गोळी झाडून घेतली

Beed News: दुष्काळी मातीत फुलला रेशमी स्वप्नांचा मळा; बीडचा पॅटर्न देशभर हिट; उत्तराखंड, झारखंड आणि कर्नाटकपर्यंत तुती रोपांचा पुरवठा

SCROLL FOR NEXT