Delta Variant Google file photo
कोकण

सिंधुदुर्गात डेल्टा प्लसची एंट्री; कणकवली परबवाडीत सापडला बाधीत

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी: जिल्ह्यात कोविड 19 (covid 19)आजाराचा नवीन स्ट्रेन ( डेल्टा प्लस ) कणकवली परबवाडी येथे सापडला असून, बाधीत भागात आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी आज दिली. (delta-plus-of-covid-19-affected-found-at-kankavli-parabwadi-covid-19-update)

प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे,

आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड 19 बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांची शोध मोहीम सुरू आहे. इली, सारी आजारातील रुग्णांची व लक्षणांबाबत सर्वेक्षण सुरू आहे. त्याचबरोबर कोविड 19 चे लसीकरणही करण्यात येत आहे. त्याशिवाय पुनःसंसर्गासाठी शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या भागातील नागरिकांनी कोविड 19 साठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेतील वैयक्तित सुरक्षेबाबत नियमित हात धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसुत्रीचे नियमित पालन करावे आणि ही महामारी आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन ही डॉ. पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटच्या क्षणापर्यंत गुप्तता; ऑपरेशन सिंदूरचा आदेश चिठ्ठीतून पोहोचला, नेमकं काय घडलं होतं? धक्कादायक खुलासा

AUS vs BAN: ऑसी दिग्गजांचा पारा चढला! बांगलादेशविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर पाँटिंगसह माजी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघाला सुनावलं

Police Honour: उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक

Health Schemes: महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय व कर्करोग उपचारांसाठी रुबी हॉल क्लिनिकशी राज्य सरकारचा करार

Marathi News Live Updates : हायकोर्टाच्या परीक्षेत गडबड, कल्याणमध्ये विद्यार्थ्यांनी अडवली न्यायाधीशांची गाडी

SCROLL FOR NEXT