Delta Plus esakal
कोकण

संगमेश्वरातील 'लोवले'त आढळले डेल्टा प्लसचे आणखी 2 रुग्ण

जूनमधील नमुन्यांचा अहवाल; रुग्ण बरे, तरी कन्टेन्मेंट झोन

सकाळ डिजिटल टीम

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथे डेल्टा प्लस व्हेरिएन्टचे (delta plus variant) आणखी दोन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात डेल्टा प्लसचे ११ रुग्ण झाले आहेत. दिल्लीहून जून महिन्यातील नमुन्यांचा अहवाल आता प्राप्त झाले आहेत. (delta plus found in konkan) त्यामुळे रुग्ण बरे झाले असले तरी खबरदारी म्हणून हा भाग कन्टेन्मेंट झोन करण्यात आला आहे. गावाबाहेर जाण्यायेण्यास बंदी घातली आहे. कडक निर्बंध लागू करण्यात आले हेत. (konkan Update)

राज्यात पहिल्यांदा सापडलेल्या २१ डेल्टा प्लस व्हेरिएन्ट (delta plus variant) रुग्णांपैकी ९ रुग्ण संगमेश्वर तालुक्यातील होते. त्यामुळे राज्यात रत्नागिरीचे नाव गेले. संसर्ग रोखण्यासाठी योग्य खबरदारीही घेतली होती. त्यानंतर त्या भागातील ११७ लोकांचे नमुने जूनमध्ये पुन्हा तपासणीसाठी दिल्लीला पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये आणखी दोन डेल्टा प्लस व्हेरिएन्टचे रुग्ण सापडले आहेत.

लोवले भागातील हे रुग्ण आहेत; मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे. उपचारांनंतर त्यांना सोडण्यात आले; मात्र खबरदारी म्हणून या भागात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हा भाग कन्टेन्मेंट झोन करण्यात आला आहे. गावाबाहेर जाणे किंवा येणाऱ्यांना बंदी घातली आहे. या भागात शंभर टक्के लसीकरण करण्याच्यादृष्टीने आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

लोवले येथे डेल्टा प्लस व्हेरिएन्टचे २ रुग्ण सापडले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून संसर्ग रोखण्यासाठी या भागात कडक निर्बंध लागू केले आहेत. शंभर टक्के लसीकरणाच्यादृष्टीने आमचे प्रयत्न आहेत.

- डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक

दृष्टिक्षेपात
- जिल्ह्यात डेल्टा प्लसचे ११ रुग्ण
- ११७ नमुने जूनमध्ये दिल्लीला
- २ ‘डेल्टा प्लस' रुग्ण सापडले
- शंभर टक्के लसीकरण करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT