Delta Variant Google file photo
कोकण

रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण शून्यावर

जिल्हाधिकारी डॉ. पाटील; चाचण्या १० हजारवर नेणार

राजेश शेळके

रत्नागिरी : जिल्ह्यात आजवर डेल्टा प्लस व्हेरिएन्टचे १६ रुग्ण सापडले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून उर्वरित सर्व बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले. आता जिल्ह्यात एकही डेल्टा प्लस व्हेरिएन्टचा रुग्ण नाही. संगमेश्वर तालुक्यातील हे सर्व रुग्ण असून तेथे योग्य ती खबरदारी घेतली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एस. पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढविण्यात येणार असून गणेशोत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांची राज्य समितीच्या मार्गदर्शनाप्रमाणे तपासणी करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. डेल्टा प्लस संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या झूम मीटिंगमध्ये ते बोलत होते.

ते म्हणाले, गेल्या महिन्यामध्ये जिल्ह्यातील कोरोनाबाधितांपैकी १६४ जणांचे नमुने ४ ऑगस्टला तपासणीसाठी दिल्लीच्या सीएसआर लॅबला पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल १५ ऑगस्टला आला असून त्यामध्ये ३ डेल्टा प्लस व्हेरिएन्टचे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये २ महिला आणि एक पुरुष आहे. महिलांपैकी एकीचे वय ५५ तर दुसरीचे ३४ आहे तर पुरुषाचे वय ४० आहे. हे सर्व बाधित बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. खबरदारी म्हणून संगमेश्वर तालुक्यातील धामणी आणि आंगवली भागामध्ये स्क्रिनिंग करण्यात आले असून तेथे एकही कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला नाही.

लसीकरण पूर्ण करण्यावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६ डेल्टा प्लस व्हेरिएन्टचे सर्व रुग्ण बरे झाले आहेत. आता जिल्ह्यात एकही डेल्टा प्लसचा रुग्ण नाही. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही.जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी येतात. तिसऱी लाट रोखण्याच्यादृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेतली जाणार आहे. त्यामुळे राज्याच्या समितीच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात येणाऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. ही लाट रोखण्याच्यादृष्टीने मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचा वापर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आम्ही चाचण्या वाढविल्या आहेत. ९ ते १० हजारापर्यंत चाचण्या नेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

निम्मे व्हेंटिलेटर बंद नाहीत

केंद्राकडून आलेल्या व्हेंटिलेटरपैकी निम्म्याहून अधिक बंद असल्याचा विषय खासदार आणि आमदारांच्या बैठकीत चर्चेला आला. त्यानुसार मी आढाव घेतला तर रत्नागिरीला मिळालेले २६ चालू स्थितीत आहेत. दापोलीला मिळालेली २ व्हेंटिलेटर बंद आहेत. चार आले आहेत त्यांचा वापरच झालेला नाही. त्यामुळे निम्म्याहून अधिक व्हेंटिलेटर बंद आहेत, अशी परिस्थिती नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT