Demand To Extend Deadlines For New Colleges Permission
Demand To Extend Deadlines For New Colleges Permission 
कोकण

नवी महाविद्यालये, कोर्ससाठी मुदत वाढवण्याची मागणी

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - कोरोनाचा (कोव्हिड-19) परिणाम पुढील शैक्षणिक वर्षावर होणार आहे. हे वर्ष लांबणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा- 2016 मध्ये आगामी शैक्षणिक वर्षात राज्यात नव्याने सुरू होणारी महाविद्यालये, नवीन विषय, अभ्यासक्रम अथवा तुकडी वाढवून देण्याकरिता मुदतवाढ मिळावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केल्याची माहिती राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी दिली. 

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 मध्ये आगामी शैक्षणिक वर्षात राज्यात नव्याने सुरू करायची महाविद्यालये, महाविद्यालयांना नवीन विषय, अभ्यासक्रम अथवा तुकडी वाढवून मागण्यासाठी कायद्याच्या कलम 109 अंतर्गत संपूर्ण प्रकिया दिली आहे. प्रत्येक विद्यापीठाने कलम 107 अन्वये जो विकास आराखडा केला असेल त्याला अनुसरून त्या त्या परिक्षेत्रातील संस्था नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर करतात. त्याचप्रमाणे नवीन अभ्यासक्रम, विषय, तुकडीसाठी प्रस्ताव सादर करावा लागतो. त्यानुसार सर्वच विद्यापीठांमध्ये असे प्रस्ताव जमा झाले आहेत. 

सर्व विद्यापीठांनी छाननी झाल्यानंतर व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेऊन 1 एप्रिल अथवा त्या आधी शासनाकडे मंजुरीसाठी विद्यापीठ कायद्याच्या कलम 109 (4) (सी) अन्वये विद्यापीठांकडे पाठविले आहेत. मात्र कोविड-19 च्या लॉकडाऊन काळामुळे सर्वच विद्यापीठांमध्ये 109 (4) (सी) मध्ये उल्लेखलेली प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अभाविपने ही मुदत वाढवून देण्याची मागणीचे निवेदन पाठवले आहे. 

शैक्षणिक वर्ष लांबणार 

कोविड-19 मुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष लांबणार आहे. प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे विद्यार्थी, पालकांची प्रवेश प्रक्रियेसाठी ओढाताण, ताणतणाव, आगामी शैक्षणिक वर्षात ही परिस्थिती अधिक गंभीर व जटिल होऊ शकते, असे विद्यार्थी परिषदेचे मत आहे. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT