Demand Of Inquire About Management Of Konal Forest Department  
कोकण

कोनाळ वनविभागातील कारभाराची चौकशीची करा अन्यथा....

सकाळवृत्तसेवा

साटेली भेडशी ( सिंधुदुर्ग ) - कोनाळ वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी उपोषण करण्याचा इशारा शिवसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी यांनी येथील वनक्षेत्रापालांना निवेदनाद्वारे दिला आहे. 

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मी गेली पंचवीस वर्षे कोनाळ गवसवाडी येथे राहते. या काळात मी वनकर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार आणि तिथल्या जंगलांमध्ये होणारे गैरव्यवहार मी पाहत आहे. त्या संदर्भातील अनेक पुरावे माझ्याकडे आहेत. ते पुरावे आपण कोनाळ वनपाल यांच्या निदर्शनास आणून दिले होते; पण त्यांनी त्याविरोधात कारवाई करण्याऐवजी या प्रकरणात लक्ष घालू नये, घातल्यास त्याचे वाईट परिणाम होतील अशी धमकी दिली. त्यामुळे आपण या प्रकाराच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला आहे.

शिरंगे येथील निर्णित क्षेत्रातील झाडांची तोड करून ती परस्पर विकली जात आहेत, कोनाळ वनसमितीसाठी केंद्र शासनाकडून कोनाळ वनविभागाकडे आलेला निधी कुठे वापरला गेला की एकाच्या खात्यावर तो जमा करून नंतर तो परस्पर इतरांच्या खात्यावर टाकून हडप केला गेला याची चौकशी व्हावी, कोनाळ वनविभागात बांबू लावण्यासाठी अन्य गावातील मजूर का आणले याची चौकशी व्हावी. दोषींवर कारवाई करावी. आपण 14 ऑगस्टपर्यंत चौकशी व कारवाई न केल्यास पंधरा ऑगस्टपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, वनमंत्री, पालकमंत्री, खासदार, जिल्हाधिकारी आणि उपवनसंरक्षक सावंतवाडी यांना पाठविल्या आहेत.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT