demand of mayor of rashtrawadi in ratnagiri if maha vikas aghadi in ratnagiri 
कोकण

'शिवसेनेने जागा दिल्या तरच महाविकास आघाडीचा विचार करू'

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : येथील पालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेने सन्माननीय जागा दिल्या तरच आम्ही महाविकास आघाडीचा विचार करू. अपेक्षा ठेवणार नाही. मात्र, आघाडी झाली तर अडीच-अडीच वर्षे नगराध्यक्षपद मागणारच, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बशीर मुर्तुझा यांनी मांडली.

‘राष्ट्रवादी’ संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत ते म्हणाले, की राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे भविष्यातील सर्वच निवडणुकांमध्ये हा फॉर्म्युला वापरण्याच्या हालचाली दिसत आहेत. शिवसेना ६०, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी २० टक्के जागा असे सूत्र ठरणार असल्याची चर्चा कानावर आहे. वरिष्ठ पातळीवर याबाबत निर्णय होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत अजून धोरण निश्‍चित झालेले नाही. मात्र, डिसेंबर २०२१ मध्ये होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने सन्माननीय जागा दिल्या तर आघाडी जरूर करू.

यापूर्वी मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर काहींच्या बैठका झाल्याची चर्चा आहे. मात्र, त्या अधिकृत नसाव्यात. अधिकृत झाल्या असत्या तर मी आणि सुदेश मयेकर त्यात नक्कीच असतो. याबाबत प्रदेशाध्यक्षांच्या कानावर हा विषय घालून पुढील निर्णय घेतला जाईल. शिवसेनेकडून आम्ही अपेक्षा ठेवणार नाही. आम्हीही तयारी केली आहे, असेही मुर्तुझा म्हणाले. 

सुर्वे किंवा कोतवडेकर होणार तालुकाध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष नाना मयेकर यांचे निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कानावरही ही गोष्टी घालण्यात आली होती. मात्र, स्थानिक पातळीवर इच्छुकांपैकी एक नाव निश्‍चित करून कळवा, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार राजन सुर्वे आणि सचिन ऊर्फ बबलू कोतवडेकर या दोघांची नावे रत्नागिरी तालुकाध्यक्षपदासाठी कळविण्यात आली आहेत. लवकरच त्यापैकी एकाची घोषणा होणार आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT