Demand for removal of encroachment konkan sindhudurg 
कोकण

अतिक्रमणाबाबत प्रशासनाला इशारा, जाणून घ्या नेमके प्रकरण!

प्रभाकर धुरी

साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - तिलारी शेटवेवाडी येथील वहिवाटीच्या जागेत एका व्यक्तीने अतिक्रमण केले आहे. त्याबाबत तहसीलदार व अन्य संबंधित कार्यालयांकडे लेखी तक्रार करूनही त्यांनी दखल घेतलेली नाही. त्याबद्दल शंकर रामचंद्र शेटवे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

तिलारी शेटवेवाडी येथे तिलारी विश्रामगृहाशेजारील गणपती मंदिराच्या बाजूला संबंधित व्यक्तीने जमीन घेतली आहे. ती जमीन घेतानाच वहिवाटीतील रस्ता कायम खुला ठेवण्याची अट घातली होती. ते त्यांनी मान्य केले होते; पण त्याकडे दुर्लक्ष करून आता त्या व्यक्तीने वहिवाटीतील जागेत कुंपण आणि गेट घातले. ते कुंपणसुद्धा सौर ऊर्जेचे आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना धोका पोचू शकतो.

त्याने केलेल्या अतिक्रमणाबाबत श्री. शेटवे यांनी तहसीलदार यांच्याकडे 30 जानेवारीला तक्रार अर्ज केला होता. त्याला सहा महिने होत आले तरीही कुणीच साधी चौकशीही केलेली नाही. त्यामुळे श्री. शेटवे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वहिवाटीच्या जागेत केलेले अतिक्रमण न हटवल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

संबंधित व्यक्ती कंपनीच्या नावावर अतिक्रमण करत आहेच, शिवाय बेकायदा जिलेटिन स्फोटही घडवून आणत आहे, अशी माहिती ब्रह्मानंद शेटवे यांनी दिली. वेळीअवेळी होणाऱ्या बेकायदा स्फोटामुळे घराला हादरे बसत असल्याने या प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

संपादन - राहुल पाटील
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी अन् एम. के. स्टॅलिन यांची गळाभेट! द्रमुक भूमिका बदलणार? चेन्नईतल्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Rajnath Singh: संरक्षण संशोधनात नेतृत्व करणारी संस्था बना; ‘डीआयएटी’ला आधुनिक तक्षशिला करण्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे स्वप्न

Tarali Project: तारळी प्रकल्पाला व्याघ्र संवर्धन निधी भरल्यानंतरच हिरवा कंदील; अदानीला २२७ कोटींच्या चर्चेवर वन सचिवांचे स्पष्टीकरण

Delimitation Bill Row : स्टॅलिन यांची मनधरणी करण्यासाठी सोनिया-राहुल गांधी चेन्नईत; 'तामिळनाडूच्या हिताशी तडजोड नाही' म्हणत डीएमके प्रमुखांचे मोठे संकेत

Dhruv Jurel: प्रत्येक अर्धशतकानंतर ध्रुव जुरेल वडिलांना का करतो सॅल्यूट? वडिलांची भावूक करणारी कहाणी आली समोर

SCROLL FOR NEXT