Delimitation Bill Row : स्टॅलिन यांची मनधरणी करण्यासाठी सोनिया-राहुल गांधी चेन्नईत; 'तामिळनाडूच्या हिताशी तडजोड नाही' म्हणत डीएमके प्रमुखांचे मोठे संकेत

संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेससह इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी रविवारी चेन्नईत एम. के. स्टॅलिन यांची भेट घेतली; मात्र स्टॅलिन आपली भूमिका बदलणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
INDIA bloc rushes over Delimitation Bill; Sonia and Rahul Gandhi meet MK Stalin

INDIA bloc rushes over Delimitation Bill; Sonia and Rahul Gandhi meet MK Stalin

Sakal

Updated on: 

INDIA Bloc Chennai Meeting : केंद्र सरकारच्या प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) विधेयकावरून सोमवारी (३० नोव्हेंबर) सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी राष्ट्रीय राजकारणात मोठी घडामोड घडली आहे.

या विधेयकाला पाठिंबा जाहीर केलेल्या द्रमुक (DMK) प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, एम. ए. बेबी आणि कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने रविवारी (२९ नोव्हेंबर) चेन्नईत स्टॅलिन यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

INDIA bloc rushes over Delimitation Bill; Sonia and Rahul Gandhi meet MK Stalin
Uddhav Thackeray Health Update : उद्धव ठाकरेंची प्रकृती बिघडली, चेन्नई दौरा रद्द; डिलिमिटेशन विधेयकावरून दिल्ली ते मुंबई राजकीय हालचालींना वेग

चेन्नईला रवाना होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी 'एक्स'वर पोस्ट करत एम. के. स्टॅलिन यांना 'भाऊ' म्हणून साद घातली. लोकसभेच्या जागा ८५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव भारतातील लोकशाही संपवून टाकेल आणि भाजप-आरएसएसला आपल्या सोयीने संपूर्ण देशाचा निवडणूक नकाशा पुन्हा आखण्याची मोकळीक देईल, असा आरोप करत राष्ट्रहितासाठी आणि तामिळनाडूच्या हितासाठी आपण मिळून या विधेयकाचा पराभव केला पाहिजे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.

'तामिळनाडूच्या हिताशी तडजोड नाही' - स्टॅलिन यांचे प्रत्युत्तर

राहुल गांधींच्या आवाहनाला उत्तर देताना एम. के. स्टॅलिन यांनीही 'भाऊ राहुल गांधी' असे म्हणत आभार मानले, मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे संकेत दिले. "आम्ही प्रत्येक निर्णय तामिळनाडू आणि तामिळ जनतेचे हित सर्वोच्च मानूनच घेतला आहे; या मार्गावर आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही," असे स्टॅलिन यांनी स्पष्ट केले.

INDIA bloc rushes over Delimitation Bill; Sonia and Rahul Gandhi meet MK Stalin
अल्गोरिदमचा खेळ की मनाची गुंतवणूक? 'डूम स्क्रोलिंग'चे हे ७ संकेत वेळीच ओळखा आणि सुटका करा!

सुधारित विधेयकात १९७१ च्या जनगणनेनुसार तामिळनाडूचा ७.१८ टक्के जागांचा वाटा कायम ठेवण्याची लेखी हमी मिळाल्यामुळेच द्रमुकने शनिवारी या विधेयकाला पाठिंबा जाहीर केला होता.

चेन्नईत पोस्टरबाजी, पुढे मुंबईत शरद पवारांची भेट

या बैठकीपूर्वी चेन्नईत स्टॅलिन यांच्या निवासस्थानाबाहेर 'गो बॅक काँग्रेस' (Go Back Congress) चे पोस्टर्सही झळकल्याचे समोर आले आहे. चेन्नईतील चर्चेनंतर इंडिया आघाडीचे नेते रात्री मुंबईत दाखल होऊन ब्रीच कँडी रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. त्यामुळे सोमवारच्या विशेष अधिवेशनापूर्वी स्टॅलिन आणि पवार आपली भूमिका बदलतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.