kokan.jpg
kokan.jpg 
कोकण

पारंपरिक खालुबाजा आणि ढोल-ताशा वाजंत्रींना मागणी वाढली

अमित गवळे

पाली ( रायगड)  : गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत डॉल्बिला बंदी आहे. तसेच गावागावांत मोठ्या प्रमाणात गणेश मिरवणुकी पारंपरिक खालुबाजा आणि ढोल-ताशांच्या गजरातच निघतात. त्यामुळे या वाजंत्रींना प्रचंड मागणी असते. मात्र यंदा या वाजंत्रींचे भाव वधारले आहेत.

गणेशमूर्ती घरी आणताना आणि विसर्जनावेळी या पारंपारिक वाद्याना अधिक मागणी असते. तसेच या वाद्यांचा वेगळा आणि विलोभनीय आवाज सर्वांना मंत्रमुग्ध करतो. त्यामुळे वर्षातून एकदा गणेशोत्सवात या पारंपरिक वाजंत्रींना मोठ्या प्रमाणात काम असते. अन्यथा वर्षभर छोट्या मोठ्या समारंभात मिळेल त्या बिदागीत ते काम करतात. सध्या साऊंडला बंदी आहे तसेच साउंड सिस्टिम व डीजे वाल्यांची संख्या देखील अपुरी आहे. आवाजाच्या डेसिबलची मर्यादा देखील आहे. परिणामी अनेक घरगुती व सार्वजनिक मंडळवाले देखील ढोल-तशालाच अधिक पसंती देतात. त्यामुळेच अर्थशास्त्राच्या मागणी पेक्षा पुरवठा कमी या नियमानुसार वाजंत्रींची संख्या कमी मात्र मागणी भरपूर असल्याने या वाजंत्रींचे भाव वधारले आहेत. काही जण तर गेल्या वर्षीपेक्षा दुपटीने बिदागी मागत आहेत. त्यामुळे सर्वसमान्यांना मात्र भ्रांत पडली आहे. मात्र चढ्या दराने देखील अनेक जण पारंपारिक वाद्य आणत आहेत.


दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पारंपारिक वाद्यआणतो. या पारंपारिक वाद्यांना खूप महत्व आहे. यावर्षी मात्र त्यांची बिदागी वाढली आहे. मात्र तरी देखील मिरवणुकीसाठी पारंपारिक वाद्यच आणले होते.
- कुमार माळी, पाली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता परतले विजयी मार्गावर, सॉल्टच्या तुफानी अर्धशतकानंतर दिल्लीवर मिळवला सोपा विजय

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT