The demand for traditional music and Dhol Tasha arguments increased
The demand for traditional music and Dhol Tasha arguments increased 
कोकण

पारंपरिक खालुबाजा आणि ढोल-ताशा वाजंत्रींना मागणी वाढली

अमित गवळे

पाली : गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत बंदी आहे. तसेच गावागावांत मोठ्या प्रमाणात गणेश मिरवणुकीत पारंपरिक खालुबाजा आणि ढोल-ताशांच्या गजरातच निघतात. त्यामुळे या वाजंत्रींना प्रचंड मागणी असते. मात्र, यंदा या वाजंत्रींचे भाव वधारले आहेत.

गणेशमूर्ती घरी आणतांना आणि विसर्जनावेळी या पारंपारिक वाद्यांना अधिक मागणी असते. तसेच या वाद्यांचा वेगळा आणि विलोभनीय आवाज सर्वांना मंत्रमुग्ध करतो. त्यामुळे वर्षातून एकदा गणेशोत्सवात या पारंपरिक वाजंत्रींना मोठ्या प्रमाणात काम असते. अन्यथा वर्षभर छोट्या मोठ्या समारंभात मिळेल. त्या बिदागीत ते काम करतात. सध्या डॉल्बिला बंदी आहे. तसेच साउंड सिस्टिम व डीजेवाल्यांची संख्या देखील अपुरी आहे आणि आवाजाच्या डेसिबलची मर्यादादेखील आहे.

परिणामी अनेक घरगुती व सार्वजनिक मंडळवाले देखील ढोल-तशालाच अधिक पसंती देतात. त्यामुळेच अर्थशास्त्राच्या मागणीपेक्षा पुरवठा कमी या नियमानुसार वाजंत्रींची संख्या कमी मात्र मागणी भरपूर असल्याने या वाजंत्रींचे भाव वधारले आहेत. काही जण तर गेल्या वर्षीपेक्षा दुपटीने बिदागी मागत आहेत. त्यामुळे सर्वसमान्यांना मात्र भ्रांत पडली आहे. मात्र, चढ्या दरानेही अनेक जण पारंपारिक वाद्य आणत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT