demand of village people to CM for refinery in rajapur ratnagiri 
कोकण

आयलॉगसाठीची दीड हजार एकर जागा रिफायनरीला घ्या; नाटे ग्रामपंचायतीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन वाढत चालले असताना तो तालुक्‍याबाहेर नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अशा स्थितीमध्ये हा प्रकल्प तालुक्‍यामध्ये व्हावा, यासाठी ग्रामपंचायतींकडून पुढाकार घेतला जात आहे. आयलॉग जेटीसाठी प्रस्तावित सुमारे दीड हजार एकर आणि परिसरातील जागा घेऊन त्या ठिकाणी रिफायनरीची उभारणी करावी अशी मागणी तालुक्‍यातील नाटे ग्रामपंचायतीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्याबाबतचा ठराव नुकताच नाटे ग्रामपंचायतीमध्ये संमत करण्यात आला. 

तालुक्‍यातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून गेल्या दोन-तीन वर्षापासून विविध मतप्रवाह निर्माण झाले आहेत. रिफायनरी प्रकल्पविरोधी असलेली धार आता हळूहळू कमी होऊ लागली असून प्रकल्प समर्थन वाढू लागले आहे. भूसंपादन रद्दचा अध्यादेश देणाऱ्या राज्य शासनाकडून मात्र रिफायनरीबाबत कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट केली जात नाही.

रिफायनरी प्रकल्प तालुक्‍यातून अन्य ठिकाणी हलविण्याच्या जोरदार हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू झाल्या आहेत. त्याचवेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्प राज्याच्या हिताचा असून तो राज्याबाहेर जाणार नाही, अशी भूमिका मांडली आहे. एका बाजूला रिफायनरी प्रकल्पावरून वरिष्ठ पातळीवर वेगाने घडामोडी होत असताना हा प्रकल्प तालुक्‍यामध्ये व्हावा, यासाठी नाटे ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. 

नाटे परिसरामध्ये जेटी प्रकल्प प्रस्तावित 

नाटे परिसरामध्ये आयलॉग जेटी प्रकल्प प्रस्तावित असून या प्रकल्पासाठी सुमारे दीड हजार एकर जागा उपलब्ध आहे. या जागेसह आजुबाजूच्या जागा संपादित करून त्या ठिकाणी रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करावी, त्यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य देण्याचे ग्रामपंचायतीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसा ठराव पारीत केल्याचे पत्र नाटे ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठविले आहे. 

अशा प्रकल्पाचे स्वागत 

रिफायनरी प्रकल्पाची संपूर्ण माहिती राजापूरवासीयांना गेल्या काही वर्षात झालेली आहे. नाणार येथील भूसंपादनाची अधिसूचना रद्द झाल्यानंतर नुकतेच मुख्यमंत्र्यांनी स्थानिक जनतेची जेथे मागणी असेल तेथे रिफायनरी प्रकल्प होईल, असे जाहीर केले होते. रिफायनरी प्रकल्प गावच्या, तालुक्‍याच्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावणारा असून अशा प्रकल्पाचे आम्ही स्वागत करत असल्याची भूमिका नाटे ग्रामपंचायतीने स्पष्ट केली आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

farmer relief fund : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजारांची मदत; नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून दिलासा

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT