Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

India fuel reserve capacity: देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा आहे का? सरकारने शिल्लक साठा जाहीर केला आहे. भारतीय कंपन्यांनी कच्च्या तेलाचा पुरवठा करण्याचे करार आधीच केले आहेत.
Fuel Storage

India fuel reserve capacity

ESakal

Updated on

Fuel Storage: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने गुरुवारी देशातील पेट्रोलियम आणि एलपीजी पुरवठ्याबाबतच्या परिस्थितीवर स्पष्टीकरण दिले. एका निवेदनात पेट्रोलियम मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतातील इंधन पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आणि नियंत्रणात आहे. त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले की घाबरण्याची गरज नाही. सर्व किरकोळ इंधन केंद्रांवर पुरेसा साठा उपलब्ध आहे. देशात कुठेही पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीची कमतरता नाही. चुकीची माहिती हेतुपुरस्सर पसरवण्याच्या उद्देशाने चालवलेल्या या दुर्भावनापूर्ण, सुनियोजित मोहिमेला बळी पडू नये, असे आवाहन मंत्रालय नागरिकांना करत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com