Additional Lote MIDC area sakal
कोकण

विस्तारित औद्योगिक वसाहतीत निदर्शने

ठेकेदाराने थकवले कोट्यवधी रुपये; व्यावसायिक झाले आक्रमक

सकाळ वृत्तसेवा

खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीच्या लवेल व असगणी येथील विस्तारित जागेत सुरू असलेल्या केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयांतर्गत सुरू असलेल्या रोलिंग स्टॉक कंपोनेंट फॅक्टरीत कामे करणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांचे फॅक्टरीच्या मुख्य ठेकेदाराने तब्बल अडीच ते तीन कोटी रुपये थकवल्याने (ता. ८) रोजी स्थानिक व्यावसायिकांनी फॅक्टरीच्या बाहेर एकत्र येऊन निदर्शने केली. तसेच थकीत रक्कम तत्काळ देण्याची मागणी केली.

भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयांतर्गत चार वर्षांपूर्वी लवेल व असगणी गावांच्या परिसरात विस्तारित लोटे औद्योगिक वसाहतीत रेल्वेचा कारखाना सुरू झाला आहे. या कारखान्याचे काम टाटा प्रोजेक्ट या कंपनीने घेतले आहे. या टाटा प्रोजेक्टचे पोटठेकेदार एचटीसी कंपनीने काही स्थानिक व्यावसायिकांना अत्यल्प दराने काही कामे दिली. कामे पूर्ण झाली. मात्र, या कामांचा मोबदला एचटीसी कंपनीने स्थानिक व्यावसायिकांना दिला नाही. जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयांची बिले या कंपनीने थकवल्याने इकडून तिकडून कर्ज काढून व्यवसायात गुंतवलेल्या या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे, तर अनेकजण दिवाळखोरीत जाण्याच्या मार्गावर आहेत. या प्रकल्पात काम करणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांनी ८ डिसेंबरला लवेल येथील या कोकण रेल्वेच्या प्रकल्पाच्या गेटसमोर निदर्शने केली.

आंदोलन तीव्र करणार

थकीत रक्कम एचटीसी कंपनीने न दिल्यास पुढील काही दिवसांत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हुसेन ठाकूर आणि हुसेन घारे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT