accident sakal
कोकण

देवगड : मोटारसायकल आणि टेंपोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अपघाताची नोंद येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

संतोष कुळकर्णी

देवगड : मोटारसायकल आणि टेंपो यांच्यामध्ये धडक (Accident) होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. वेदांत सुनील राणे (वय 23, रा. मिठबांव) असे त्याचे नाव आहे. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला अक्षय अरूण आर्लेकर (वय 25) जखमी झाला. अपघात काल (ता.16) रात्री सव्वाबाराच्या सुमारास तालुक्यातील मिठबांव पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर घडला. अपघाताची नोंद येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिठबांव येथील वेदांत राणे आणि अक्षय आर्लेकर मोटारसायकलवरून मिठबांवच्या दिशेने येत होते. त्यावेळी समोरून येणारा टेंपो आणि मोटारसायकल यांच्यामध्ये धडक होऊन अपघात झाला. यामध्ये मोटारसायकलस्वार वेदांत राणे जागीच ठार झाला. त्याच्या मागे बसलेला अक्षय जखमी झाला.

त्याला उपचारासाठी मिठबांव प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. अपघात घडल्यावर टेंपोचालकाने तेथून पळ काढला. मात्र पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवून त्याचा शोध घेत त्याच्याविरूध्द तक्रार नोंदवली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी भेट दिली. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT