Poison Sakal
कोकण

नैराश्य आल्याने पत्नीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

नवऱ्याचे निधन झाल्यामुळे नैराश्य आल्याने पत्नीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना काल (ता.११) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.

अनिल चव्हाण

आंबोली - नवऱ्याचे निधन झाल्यामुळे नैराश्य आल्याने पत्नीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना काल (ता.११) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. संबंधित महिलेला अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आंबोली-मूळवंदवाडी येथे रविराज प्रकाश देसाई (वय ४७, रा.मूळ कारवार) व त्यांची पत्नी राजश्री रविराज देसाई (वय ३५ रा.फोंडा-गोवा) हे दोघे पती-पत्नी भाड्याने राहतात. रविराज हे खूप दिवसांपासून आजारी होते. दरम्यान त्यांचा शनिवारी (ता.११) हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला. पतीच्या निधनाची बातमी समजताच पत्नी राजश्री हिने विष प्राशन व हातावर ब्लेडने वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बाजूला राहणाऱ्या लोकांना समजला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. तेथील नागरिकांनी तिला उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई, पोलीस नाईक दीपक शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.

रविराज यांचा मृतदेह आंबोली आरोग्य केंद्रात आणल्यानंतर डॉ. महेश जाधव यांनी प्राथमिक तपासणी केली. रविराज यांचा मृत्यू हृदयविकारानेच झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे, असे आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जाधव यांनी सांगितले. या घटनेची खबर घरमालक साईनाथ पावसकर यांनी आंबोली पोलिसांत दिली आहे. सायंकाळी उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव, तौसिफ सय्यद यांनी आंबोलीत जाऊन घटनेची माहिती घेतली. अधिक तपास श्रीमती यादव, तौसिफ सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दत्तात्रय देसाई करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

SCROLL FOR NEXT