Despite Lock Down Mumbai Citizens Come To Rajapur  
कोकण

लॉकडाऊन असूनही मुंबईतील लोक राजापुरात 

सकाळवृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी) - लॉकडाऊन आणि जिल्हा बंदी असूनही गेल्या दोन ते तीन दिवसात आठ ते दहा लोक मुंबईतून राजापूर तालुक्‍यात दाखल झाल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. राजापूरातुन मुंबईत आंबा वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून ही मंडळी राजापुरात आली आहेत. आरोग्य विभागाने त्यांना विलिगीकरण कक्षात दाखल केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय साबळे यांनी दिली. 

राजापूर तालुका हा कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या बाबतीत सुरक्षित तालुका आहे. गेल्या 20 दिवसात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 13 जणांपैकी 6 जणांचे स्वॅब तपासण्यात आले असून ते निगेटीव्ह आहेत. उर्वरित 7 जणांचे स्वॅब तपासण्याची आवश्‍यकताच नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याने तालुक्‍यात कोणताही धोका नाही. आजपर्यंत तालुक्‍यात 256 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून 53 जणांची होम क्वारंटाईनची मुदत संपली आहे. मात्र त्यांनीही पुढे काही काळ क्वारंटाईन करून ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले. गेल्या तीन दिवसात मुंबईतून राजापूर शहर, महाळुंगे व अन्य काही ग्रामीण भागात आठ ते दहा मुंबईकर चाकरमानी दाखल झाले आहेत. याची माहिती मिळताच आरोग्य विभागाने त्यांना होम क्वारंटाईन केले असून त्यांची तपासणी केली.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT