development plan of 211 crores cut in ratnagiri  
कोकण

रत्नागिरीत तब्बल इतक्या कोटींच्या विकास आराखड्याला कात्री...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोना महामारीने जिल्हा नियोजन समितीचा आर्थिक ताळेबंद पुरता कोलमडला आहे. २११ कोटींच्या विकास आराखड्याला कात्री लावल्यामुळे विकासासाठी अवघे ५३ कोटी जिल्हा प्रशासनाच्या हाती उरले आहेत. या परिस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी पालकमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या तोकड्या निधीचे विकासकामांसाठी वाटप करताना प्रशासनाची कसरत होणार आहे.

जिल्हा नियोजन समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या बैठकीबाबत माहिती दिली. बैठक १४ ऑगस्टला दुपारी ३ वाजता येथील अल्पबचत सभागृहात होणार आहे. बैठकीत २० जानेवारीला झालेल्या बैठकीचे इतिवृत्त कायम करणे, कार्यपूर्ती अहवाल तसेच मार्च २०२० पर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा व २०२०-२१ च्या कामाचे नियोजन आदी कामकाज होणार आहे. जिल्ह्यातील कोविडच्या स्थितीचा आढावा, चक्रीवादळात बाधितांना झालेले मदतीचे वाटप यावरही चर्चा होणार आहे.

कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शासनाने जिल्हा नियोजन समितीच्या विकास आराखड्यास ३३ टक्के कात्री लावली. त्याचा विकासकामांवर मोठा परिणाम झाला आहे. कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेची घडी घालण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र इतर खर्चावर शासनाने निर्बंध घातले आहेत. जिल्हा परिषदेलाही याचा सामना करावा लागणार आहे. 

कसे निधी वाटप करायचे हाच प्रश्‍न 

जिल्हा नियोजन समितीच्या २११ कोटी खर्चापैकी ३३ टक्केच निधी खर्च करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. त्यामुळे अवघा ७० कोटी निधी समितीच्या वाट्याला आला आहे. त्यापैकी १७ कोटी कोरोना महामारीशी सामना करण्यासाठी राखून ठेवला आहे. त्यापैकी ८ कोटी रुपये विविध उपाययोजनांवर खर्च केले आहेत. ७० कोटीतून १७ कोटी वजा केल्यास फक्त ५३ कोटीच जिल्ह्याच्या विकासासाठी उरले आहेत. या त्रोटक निधीचे विविध विकासकामांवर कसे वाटप करायचे हा मोठा प्रश्‍न पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनासमोर असणार आहे.

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : खिशात नाही दाणा अन्... ! Mumbai Indians च्या खेळीने सारे चक्रावले; CSK च्या रणनीतीने KKR चा खिसा कापला...

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र घटले, मका २७० हेक्टरने लागवड वाढली

दिग्पाल लांजेकरांच्या श्री शिवराज अष्टकातील सहावे पुष्प भेटीला; महाराजांची आग्रा स्वारी दिसणार, चित्रपटाचं नाव काय?

Maharashtra Politics: काँग्रेसचा मोठा नेता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर? पालिका निवडणुकीआधी राजकीय भूकंपाचे संकेत

Hasan Mushrif : ‘आम्ही केलं; आता जबाबदारी तुमची’ शेंडा पार्क वैद्यकीय नगरीत मंत्री हसन मुश्रीफ यांचा ठाम संदेश

SCROLL FOR NEXT