devgad hapus mango issue  
कोकण

यंदा देवगड हापूस मर्यादितच 

संतोष कुळकर्णी

देवगड (सिंधुदुर्ग) - बदलते वातावरण, अवकाळी पाऊस, कीडरोगाचा प्रादुर्भाव यामुळे आंबा हंगामाच्या पहिल्या टप्प्यात आंबा कलमांना मुबलक मोहोर आला खरा; मात्र आलेल्या मोहोरोत नरफुलांचे प्रमाण अधिक राहिले. आलेल्या मोहोराला भरपूर फलधारणा होण्याच्या आशेने आंबा बागायतदारांनी फवारणी केली; मात्र फलधारणा मर्यादित झाल्याने बागायतदारांची निराशा झाली आहे. त्यामुळे यंदा देवगड हापूसचे उत्पादन मर्यादितच राहण्याची शक्‍यता आहे. 

दरवर्षी आंबा हंगामात बागायतदारांना निसर्गाचा वेगळाच अनुभव गाठीशी येत आहे. गतवर्षी हंगामावर कोरोना आणि पर्यायाने झालेल्या लॉकडाउनचे सावट होते. तरीही आंबा हंगामामध्ये राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये हापूस पोचवण्यात बागायतदार यशस्वी झाला. विक्री व्यवस्थेतील वेगळा अनुभव आंबा बागायतदारांना घेता आला. यातून तुलनेत हंगामच चांगला आणि समाधानकारक गेल्याचे मानले जाते. यंदाही पावसाचे प्रमाण सुरवातीपासून चांगले राहिले; मात्र पाऊस लांबल्याने थंडी लांबली. त्यानंतर थंडी पडायला सुरवात झाली आणि यंदाच्या आंबा हंगामाची चाहूल लागली. आंबा कलमे मोहरू लागली आणि बागायतदारांच्या आशा पल्लवीत झाल्या. 

आलेला मोहोर टिकवून त्यातून उत्तम फलधारणा होण्यासाठी फवारणी सुरू झाली. थंडीचे प्रमाण वाढल्याने आंबा कलमे चांगलीच मोहोरली. यातून मुबलक फलधारणा होईल या आशेने फवारणीचा वेग वाढला; मात्र आलेल्या मोहोरात नरफुलांचे प्रमाण अधिक राहिल्याने बऱ्याच प्रमाणात मोहोर वाया गेला. यातून अपेक्षित फलधारणा झाली नसल्याने बागायतदारांच्या पदरी निराशा आली. यामुळे यंदाचा आंबा हंगाम सुरू झाला तरी त्याला वेग नसल्याचे मानले जात आहे. त्यामुळे बागायतदारांच्या आशा आता अखेरच्या टप्प्यातील मोहोराकडे लागल्या आहेत. 

सुरवातीच्या टप्यात आंबा कलमांना मुबलक मोहोर आला; मात्र त्यात नरफुलांचे प्रमाण अधिक राहिल्याने अपेक्षित फलधारणा झाली नाही. आशेने केलेली मेहनत वाया गेली. त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. याकडे विमा कंपन्यानी लक्ष द्यावे.
- सदाशिव ओगले, आंबा बागायतदार, दहिबांव 

यंदाच्या आंबा हंगामाची सुरवात खडतर झाली. आलेल्या मोहोराच्या तुलनेत उत्पादन झाले नाही. त्यातच अवकाळीने बागायतदारांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन बागायतदारांना भरपाई देण्याचा विचार करावा.
- नंदकुमार घाटे, ज्येष्ठ आंबा बागायतदार, देवगड 

कोकणातून आज वाशी फळबाजारात सुमारे साडेसात हजार आंबा पेटी आली. यामध्ये अलिबागपासून वेंगुर्लेचा समावेश आहे. पाच हजार पेट्या राज्याच्या इतर भागातून आल्या. यामध्ये हापूससह बदामी, तोतापुरीचा समावेश आहे. दोन ते सहा हजार पेटीचा भाव आहे. नरफुलांचे प्रमाण असले तरीही लागवड वाढल्याने आंब्याची आवक बऱ्यापैकी आहे.
- संजय पानसरे, आंबा व्यापारी, वाशी फळबाजार 

संपादन - राहुल पाटील
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Physics NEET Paper Leak Case : नीट फिजीक्सचा पेपर फोडणाऱ्या महिलेचे नाव समोर, सीबीआयची पुण्यात मोठी कारवाई; तीसरी पण 'मनिषा'च शोधली

America-Iran War: अमेरिका-इराण युद्ध केवळ पाच सेकंदात संपू शकतं; जागतिक वित्तीय संस्था 'जेफरीज'चा खळबळजनक दावा

Farmer loan waiver Maharashtra : शेतकरी कर्जमाफी आचारसंहितेत अडकणार का? पूर्वतयारी अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांनी गुपीत फोडलं

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणात महिलेला अटक

Dog Bite Crisis: माळेगावात पिसाळलेल्या श्वानाचा हैदोस; सात नागरिक जखमी, दोन वृद्ध महिलांना नांदेडला हलविले

SCROLL FOR NEXT