

Latest Marathi News Live Update
esakal
राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अर्जाचा भाग दोन आणि महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम नोंदविताना शुक्रवारी संकेतस्थळावर ‘ट्रॉफिक जाम’ झाल्याने पुन्हा एकदा ते ठप्प झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, संकेतस्थळातील तांत्रिक अडचण दूर करण्यात आली असून प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेशाच्या सुधारित वेळापत्रकानुसार आता या फेरीसाठी विद्यार्थ्यांना येत्या सोमवारपर्यंत (ता. २५) नोंदणी आणि महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम नोंदविता येणार आहे. तर पहिल्या फेरीची निवड यादी येत्या शुक्रवारी (ता. २९) जाहीर केली जाणार आहे.