devgad hapus mango vashi market
devgad hapus mango vashi market  
कोकण

देवगड हापूस वाशी बाजारात रवाना 

संतोष कुळकर्णी

देवगड (सिंधुदुर्ग) - एकीकडे खराब हवामान, ढगाळ वातावरण, अशा स्थितीत यंदाच्या आंबा हंगामाची सुरुवात खडतर वाटत असतानाच आज तालुक्‍यातील कुणकेश्‍वर येथून दोन पेट्या हापूस वाशी फळबाजारात रवाना झाला. तेथील शेतकरी शंकर नाणेरकर यांचा हा हापूस आहे. यंदाच्या हंगामातील ही पहिलीच पेटी ठरणार आहे. 


आंबा हंगामाची नुकतीच चाहूल लागली आहे. अजूनही पूर्ण क्षमतेने तालुक्‍याच्या विविध भागांतील आंबा कलमे मोहोरलेली नाहीत. अलीकडेच थंडी पडायला सुरुवात झाली असल्याने आंबा हंगामाच्या दृष्टीने पोषक वातावरण तयार होते; पण अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे बागायतदार चिंतेत आहेत. त्यातूनही यंदाच्या आंबा हंगामाच्या दृष्टीने दिलासादायक ठरणारी बाब म्हणजे तालुक्‍यातील कुणकेश्‍वर येथील एका बागायतदाराचा दोन पेटी आंबा वाशी फळबाजारात रवाना झाला. पाठवलेल्या आंब्याला किती दर मिळणार, याची माहिती लवकरच समजेल. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT