devgad panchayat samiti meeting 
कोकण

अवैध दारूबाबत देवगडात संताप

संतोष कुळकर्णी

देवगड (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील अवैध व्यवसायावरून आजच्या पंचायत समितीच्या मासिक सभेत पुन्हा चर्चा रंगली. तालुक्‍यात राजरोसपणे अवैध दारूची विक्री होते. पोलिसांचे तपासणी नाके करतात काय? दारू काय विमानातून येते काय? असे संतप्त प्रश्‍न सदस्य सदाशिव ओगले यांनी उपस्थित केले. याबाबतच्या सभागृहाच्या भावना जिल्हा पोलिस अधीक्षकांना कळवा, असेही त्यांनी सुचित केले. 

येथील पंचायत समितीची मासिक सभा सभापती सुनील पारकर यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजी महाराज सभागृहात झाली. व्यासपिठावर उपसभापती अमोल तेली, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहायक गटविकास अधिकारी अरूण चव्हाण होते. तालुक्‍यात अवैध दारूविक्री सुरू असल्याकडे श्री. ओगले यांनी लक्ष वेधून पोलीसांच्या सुमार कामगिरीबाबत नाराजी व्यक्‍त केली.

पोलिसांकडून झालेल्या कारवाईची माहिती समोर येताच ओगले भडकले. पोलिस थातुरमातुर कारवाई केल्याचे दाखवतात; मात्र बडे धेंडे त्यांना मिळत नाहीत? आज तरूणपिढी व्यसनाधिन होत असल्याने त्याला जबाबदार कोण? पोलीसांच्या तपासणी नाक्‍यावर कडक अंमलबजावणी होत असेल तर दारू काय विमानातून येते? पोलीसांच्या आशिर्वादाने दारू वाहतुक होते काय? अशी विचारणा केली. कोरोनापेक्षाही सुरक्षितपणे दारूची वाहतुक होत असल्याबद्दल श्री. ओगले यांनी चिंता व्यक्‍त करून स्थानिक पोलीस यामध्ये कमी पडत असतील तर जिल्हा पोलीस अधिक्षकांना लेखी कळवा असेही त्यांनी सांगितले. यावेळी अन्य सदस्यांनीही ओगले यांच्या भुमिकेला साथ दिली. 

तालुक्‍यात 2012 पासून सुमारे 350 कृषी पंपाची वीज जोडणी प्रलंबित आहे. अडचणीच्या ठिकाणी केंद्राची सौर कृषि संजीवनी योजना असून राज्याचीही तशाच प्रकारची सौरपंप योजना आहे. मात्र महावितरण लाभार्थ्यांना त्याची माहिती देऊन त्यांचे प्रस्ताव करण्यात चालढकल करीत आहे. त्यामुळे महावितरणने संबधित लाभार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरून घेतल्यास प्रतिक्षा यादी संपेल असे ओगले यांनी सांगितले. बांधकामासाठी लागणाऱ्या वाळू लिलावामध्ये शासनाकडून चालढकल सुरू आहे. महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना वाढीव दराने वाळू घ्यावी लागत असल्याकडे ओगले यांनी लक्ष वेधले. 

इतिवृत्त सदोष 
सभेचे इतिवृत्त सदोष असल्याचे सदस्य अजित कांबळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. ज्यांची सुचना असेल त्यांचीच नावे इतिवृत्तात नोंदवा, असे सुचवले. यावेळी शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा झाली. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

SCROLL FOR NEXT