devotees-visting-to-pali.jpg 
कोकण

अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त पालीत भक्तीमळा फुलला

अमित गवळे

पाली(रायगड) : अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त येथील अष्टविनायकापैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी मंगळवारी (ता.17) भाविकांची मांदियाळी होती. मुसधार पावसातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.  येथील दुकानदार व हाॅटेल व्यवसायिकांचा धंदा देखील तेजीत होता. 

अंगारक संकष्टी चतुर्थी बरोबरच साखरचौथ चा गणपती देखील मंगळवारी (ता.17) होता. त्यामुळेच रायगड जिल्ह्यातील विविध भागांसह मुबंई, ठाणे व पुणे आदी शहरांसह महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर पालीत दाखल झाले होते. काही तरुण, महिला यांनी पायी चालत देखील दर्शनासाठी आले होते. भर पावसातही भक्तांच्या उत्साहाला आणि भक्तीला उधाण आले होते. सर्वत्र भक्तिमय व प्रफुल्लित वातावरण निर्माण झाले होते. मंदिर देखील हार, फुले आणि विद्युत रोषणाईने सजविले होते. 

अंगारक संकष्टी निमित्त मंदिर परिसरातील दुकाने व हाॅटेल ग्राहकांनी गजबजले होते. मंदिर परिसरात मोठी वर्दळ पहायला मिळत होती.  बल्लाळेश्वर मंदिर परिसरात रानभाज्या व काकडी घेऊन अनेक विक्रेत्या बसल्या होत्या. देवळात येणारे भाविक आवर्जून येथून हा रानभाज्या व काकडी खरेदी करत होते. त्यामुळे या विक्रेत्यांचा धंदा देखील चांगला झाला. पालीत दाखल झालेल्या भाविकांच्या गाड्यांमूळे काही प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. परंतू पाली पोलीस व बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते. मंदिर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी बल्लाळेश्वर देवळाजवळील मुख्य रस्त्यावरून जाणारी वाहतूक भक्त निवास क्रमांक एक च्या बाजूने वळविण्यात आली होती. 

 भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने  चोख व्यवस्था करण्यात आली होती. परिसरातील हॅाटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार , फुल व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले आदींनी योग्य तयारी केली होते. 

''बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नाममात्र दरात प्रसादालयामध्ये प्रसाद उपलब्ध आहे. भाविकांना राहण्यासाठी दोन सुसज्ज भक्त निवास आहेत. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य पार्किंग देखील आहे. तेथे मोफत पार्किंगची व्यवस्था आहे. तसेच सुसज्ज स्वच्छता गृह देखिल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणार्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.''
- अॅड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Nitesh Rane, Disha Salian case : आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणावर नितेश राणे तोंड सांभाळणार, थेट सांगून टाकलं 'धन्यवाद'...

Pathardi Bribery Case : पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलिस अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT