Devotees at Ballaleshwar
Devotees at Ballaleshwar  
कोकण

बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी अालेल्या भाविकांची क्षुधा शांती

अमित गवळे

पाली (जिल्हा रायगड) - संकष्टी चतुर्थी निमित्त येथील अष्टविनायकापैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी शनिवारी (ता. 27) भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अालेल्या भाविकांना शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खजुर व शेंगदाणा लाडू अाणि खिचडीचे वाटप करुन त्यांची क्षूधा शांत केली. जवळपास दीडशेहुन अधिक भविकांनी याचा लाभ घेतला

मुंबई विदयापीठाच्या अजिवन अध्ययन व विस्तार कार्य विभागातर्फे प्रथम वर्ष विज्ञान शाखेच्या विदयार्थ्यांनी अन्नपुर्णा योजने अंतर्गत हा उपक्रम राबविला. खजूर व शेंगदाणा लाडू ऋतूजा निकम, दिक्षा पाटील, रिद्धि ठाकूर, प्रिया शिर्के, या विदयार्थीनींनी तर साबुदाणा खिचडी गणेश पाशीलकर, जयेश ठाकूर यांनी तयार केली. यासाठी त्यांच्या पालकांनी व रोशन शेंडगे, ऋतिक मोरे, महेश बांगरे, मितेश कावटे व सिद्धेश टाकळेकर या विदयार्थांनी विषेश सहकार्य केले.

मुंबई विदयापीठाच्या अजिवन अध्ययन व विस्तार कार्य विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमा अंतर्गत पालीवाला महाविद्यालयातील विदयार्थ्यांसाठी विवीध प्रकल्पांचे काम केले जाते. या विभागामार्फत स्त्रियांचा समाजातील दर्जा, सर्वेक्षण, करियर प्रकल्पातून जनजागृती व अन्नपुर्णा योजनेतून समाजामध्ये अन्नाविषयी महत्व पटवून दिले जाते. असे विविध उपक्रम व प्रकल्प राबविले जातात. या विभागाचे संचालक डाॅ. दिलीप पाटील व शेठ ज. नौ. पालीवाला महाविदयालयाचे प्राचार्य युवराज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय समन्वयक प्रा. देवीदास शिवपुंजे, विस्तार कार्य शिक्षक यशवंत भांडकोळी व दिलीप निकम उत्तम प्रकारे सर्व प्रकल्प राबवित आहेत.

या कार्यक्रमास महाविदयालयाचे उपप्राचार्य सुधीर पुराणीक, प्रा. मानलिंग लिमण, डाॅ. अंकूश सोहनी, प्रा. अंजली पुराणीक व प्रा. एस. एस. खैरणार उपस्थित होते. कार्यक्रमास बल्लाळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अॅड. धनंजय धारप व विश्वस्थांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच यावेळी विश्वस्त राहुल मराठे, माजी विदयार्थी दर्शन मोरे व महेश शिदोरे उपस्थित होते.

मुंबई विदयापीठाच्या अजिवन अध्ययन व विस्तार कार्य विभागातर्फे मागील दहा वर्षांपासून आमच्या महाविद्यालयात प्रभावी प्रकल्प व उपक्रम राबवित आहोत. जिथे कोणी पोहचत नाही. तिथे आम्ही पोहचतोय (रिच टू अनरीच) समाजातील प्रत्येक घटकाला याचा चांगला फायदा होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये देखील विविध कौशल्य विकसित होत आहेत. समाजप्रती पर्यायाने देशासाठी काही तरी करण्याची जिद्द वाढीस लागते.  - प्रा. देवीदास शिवपूजे, क्षेत्रीय समन्वयक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT