devrukh businessman provide fund health facility 
कोकण

देवरुखातील व्यापाऱ्यांनी जपली अशीही माणूसकी

सकाळ वृत्तसेवा

साडवली - कोरोनामुळे बाजारपेठा बंद आहेत. तरीही देवरुख बाजारपेठेतील दुकानदारांनी गोरगरीबांना धान्य व आवश्यक वस्तू देण्यासाठी ५० हजार रुपये जमवले तसेच विविध संस्थानाही मदत करायला लावून लाखाचा माल गोरगरीबांना देवून माणुसकी जपली. 

देवरुख बाजारपेठ व्यापारी संघटनेने प्रशासनाला सहकार्य केले. व्यापारी वर्गाने आवाहन करुन सामाजिक बांधिलकी म्हणून ५० हजारांचा निधी गोळा केला. व्यापारी दरात ना नफा ना तोटा दरात जिन्नस पॅकेट तयार केली व त्याचे आवश्यक कुटुंबाना वितरण करण्यास सुरुवात केली आहे. 

देवरूख मधील व्यापारी वर्गाच्या या मोहिमेत संस्था संघटना सहभागी झाल्या आहेत. आकार आॅर्गनायझेशन युवा विभाग, संगमेश्वर तालुका बॅडमिंटन क्लब, महाराष्र्ट नवनिर्माण सेना देवरुख शहर, देवरुख लायन्स क्लब, संगमेश्वर तालुका प्रेस क्लब आदिंनी यात योगदान दिले आहे. बाबा सावंत, कांता पोकळे, निलेश चव्हाण, मंगेश प्रभुदेसाई, उल्हास नलावडे, संजु पटेल, प्रमोद हर्डीकर, राणू कोचिरकर, सागर संसारे, भोलू पटेल, अभिषेक अग्रवाल, राजू जागुष्टे आदिंसह सर्व सहकार्‍यांनी यात योगदान देवून माणुसकी जपली. 
कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. दळणवळणाची साधने नसल्याने अनेक कुटुंबांना उपासमारी घडत आहे. या कुटुंबांना निदान एकवेळचे तरी अन्न मिळावे म्हणून बाजारपेठ बंद असूनही व्यापारी वर्गाने निधी गोळा करुन अन्नधान्य देवून सामाजिक बांधिलकी जपली. संस्था, संघटना, राजकीय पक्ष, पत्रकार यांनीही यात हातभार लावून लाखमोलाची कामगिरी पार पाडली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alphonso Mango Price : हापूसचा 'रुबाब' वाढला! 5 हजारांपासून 12 हजारांपर्यंत एक पेटी; सोन्याच्या दरात विकला जातोय कोकणचा राजा

Accident News : देवदर्शन ठरले अखेरचे ! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांंचा दुर्दैवी मृत्यू

Jalna News: परतूर तालुक्यात कामगार योजनेत मनमानी; वर्ष उलटले तरीही क्लेम रखडलेले

Marathi Language : इस्रायलमध्ये मराठीचा झेंडा! इवा तळेगावकरांनी परदेशात जपली मातृभाषेची ओळख

Government Subsidy Disabled: आनंदाची बातमी! दिव्यांगाच्या टुलकिटसाठी १५ हजारांचे अनुदान; लवकरच हाेणार अंमलबजावणी, 3९ वर्षांनंतर अनुदानात वाढ..

SCROLL FOR NEXT