कोंडवाडीत आली लालपरी; अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली 
कोकण

कोंडवाडीत आली लालपरी; अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली

पांगरी-कोंडवाडीवासीयांना कुतूहल; रस्त्यावरील खड्डे बुजवून स्वागत

सकाळ वृत्तसेवा

देवरूख : वाडीवस्तीत अद्यापही लालपरीच्या चाकाचे ठसे उमटलेले नव्हते. किमान मूलभूत गरज असलेली सर्वसामान्यांची आधार असलेली एसटी वाडीवस्तीत यावी, एवढी माफक अपेक्षा ग्रामस्थांची होती. तशी मागणी सातत्याने होत असताना अशातच एक दिवस एसटीची एक गाडी पांगरी-कोंडवाडीत आली. ग्रामस्थांना अक्षरशः सुखद धक्काच बसला. पांगरीच्या (ता. संगमेश्वर) एका टोकाला सीमेवर वसलेल्या कोंडवाडीतील ग्रामस्थांनी पहिल्यांदा वाडीत आलेली एसटी पाहिली. अनेक वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागली. वाडीत आलेला कच्चा रस्ता, त्यावर पावसाने पडलेले मोठा खड्डे एसटीच्या आगमनाला बाधा ठरू नयेत, म्हणून ग्रामस्थांनी श्रमदानाने खड्डे बुजविले.

जग डिजिटल झालं. सारे काही एका क्लिकवर आलं, पण अजूनही दुर्गम ग्रामीण भागात मूलभूत सुविधांचा अभाव जैसे थे आहे. काही गावांतील अनेक वाडीवस्त्यांवर अजूनही लालपरीचे दर्शन झालेले नाही. हीच स्थिती पांगरी (ता. संगमेश्वर) गावातील मुख्य वस्तीतील वाड्यांची आहे. गावात पांगरी शाळा क्रमांक दोनपर्यंत पक्का डांबरी रस्ता आहे; मात्र तरीही अजून तेथेही नियमित एसटीची फेरी नाही. त्यामुळे धारेखालची वाडी, कोंडवाडीपर्यंत कच्चा रस्ता असल्याने तेथे एसटी येणे दूरचेच. कोंडवाडी हे पांगरीचे सीमेवरचे गाव. वायंगणेतून कोंडवाडीपर्यंत कच्चा जोडरस्ता झाला आहे. दरम्यान, नियमित किमान तीन फेऱ्या कोंडवाडीपर्यंत सुरू व्हाव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण व्हावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडे करण्यात आली आहे.

कोंडवाडीवासीयांची वायंगणेपर्यंत पायपीट...

देवरूख-वायंगणे अशी नियमित एसटी सुरू असते. मात्र, त्यासाठी कोंडवाडीतील लोकांना वायंगण्यात पायी जावे लागते. ही गरज ओळखून पांगरीचे सरपंच सुनील म्हादे यांनी वायंगणेत येणारी गाडी कोंडवाडीपर्यंत यावी, अशी मागणी सातत्याने केली होती. यासाठी वायंगणेतील मनसे शाखाप्रमुख समीर रांबाडे यांचेही प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना यश येऊन नुकतीच एसटी महामंडळाने कोंडवाडीपर्यंत बसफेरीची चाचणी घेतली. हा रस्ता खूपच खराब आहे. त्यामुळे त्याची डागडुजी होणे गरजेचे आहे. गाडी वळण्यासाठीही जागा नव्हती, ही प्राथमिक गरज ओळखून ग्रामस्थांनी श्रमदानाने रस्ता व्यवस्थित केला. मोठमोठे खड्डे भरले. ग्रामस्थांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT