रत्नागिरीतील 10 तरूणांनी केला ढाक भैरी आणी कळकराय सुळका सर sakal
कोकण

रत्नागिरीतील 10 तरूणांनी केला ढाक भैरी आणी कळकराय सुळका सर

अत्यंत कठीण श्रेणीत मोडणारा रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील ढाक भैरीतील गुहा आणि याच किल्ल्याजवळ असलेला 'कळकराय' सुळका

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : अत्यंत कठीण श्रेणीत मोडणारा रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील ढाक भैरीतील गुहा आणि याच किल्ल्याजवळ असलेला 'कळकराय' सुळका रत्नागिरीतील 10 साहसी तरूणांच्या चमुने नुकताच सर केला. ढाक भैरीला जाण म्हणजे साक्षात मृत्युला आमंत्रण देणच. पण त्यावरही मात करत रत्नागिरीतील जिद्दी माउंटेनेरिंगने हा सुळका सर केला.या मोहिमेत धिरज पाटकर, अरविंद नवेले, उमेश गोठिवरेकर, आकाश नाईक, कु. प्राची नाईक, मंदार सावंत, दिनेश आग्रे, शक्ती नागवेकर, कौस्तुभ पड्यार, परेश बाम आणी या चमुमध्ये सांगली येथुन खास सहभागी झालेले इंद्रजित खंडागळे यांनी भाग घेतला होता. तसेच या मध्ये एकमेव प्राची नाईक या तरूणीचा सहभाग हे या धाडसी मोहिमेचे खास वैशिष्ठ्य होते.

या किल्ल्यावर कर्जंत वरून सांडशी या गावातुन जातात. या गावातुन जायच असल्यास अनेक डोंगर पार करत या ठिकाणी पोहोचायला जवळजवळ 5 तास लागतात. रत्नागिरीच्या चमुने या सांडशी गावातुन या किल्ल्यापर्यंतचा प्रवास केला. सकाळी 9 वाजता या ट्रेकची सांडशी गावासुन सुरवात करण्यात आली. अवघड असे अनेक डोंगक कपा-यांच्या अडथळ्यांना पार करत 5 तास चालल्या नंतर दुपारी 2.30 वाजता रत्नागिरीच्या या चमुला ढाकच्या पायथ्याशी पोहोचण्यात यश आले. यानंतर या ढाक्या गुहेमध्ये जाण्यासाठी सरसोट 90 अंशाची चढाई सुरू झाली. सर्वजण या गुहेत दुपारी 3.30 ला पोहोचल्या नंतर तिथे थोडावेळ थांबुन पुन्हा त्याच मार्गाने 90 अंशात खाली उतरण्याचा अतिथय खतरनाक असा उलटा प्रवास करत पुन्हा हा चमु ढाकच्या पायथ्याथी असलेल्या गुहेत रात्रीच्या मुक्कामाला थांबला.

ढाकच्या किल्ल्याच्या जवळच असलेला कळकराय या सुळक्यावर दुस-या दिवशी पहाटे 3.30 वाजता उठून या चमुने 6 वाजता चढाई ( क्लायंबिंग) करण्यास सुरवात केली. टिमचे लिडर अरविंद नवेले यांनी लिड करत रोप फिक्स करत पुढे गेले त्यांना चिपळुणचे आकाश नाईक यांनी मदत केली. त्यांच्या पाठोपाठ उमेश गोठिवरेकर यांनी चढाई केली. अशा प्रकारे एका मागुन एक चढाई करत या सुळक्याच्या माथ्यावर सकाळी 11 वाजता सर्वांनी पाय रोवला. या सुळक्यावर पोहोचल्यावर थोड्याच वेळात सुळक्याच्या माथ्यावरून त्याच्या पायथ्यापर्यंत रॅपलिंग करत उतरण्यात आले. या तरूणांच्या या धाडसी मोहिमेची सांगता झाली. या सुळक्याची उंची 200 फुटापर्यत असुन या ठिकाणी सकाळी प्रचंड वेगाने वारे वहातात. या वा-यांचा वेग ताशी 100 ते 150 इतका असताना देखील या धाडसी तरूणांनी या सुळक्यावर केलेली चढाई एक वैशिष्ठच म्हणावे लागेल.

ढाक बहिरी हा रायगड जिल्ह्यातील सांडशी गावात स्तिथ बुलंद असा एक किल्ला आहे. ढाकच्या किल्ल्याच्या बाजूस असणार्‍या सुळक्याला ‘कळकरायचा सुळका’ असे म्हणतात. हा किल्ला रहिवासी ठाकूर आदिवासींच्या दैवत बहिरी देवांना समर्पित आहे म्हणूनच त्याला ढाक बहिरी असे म्हणतात. या बहिरीच्या गुहेत बहिरीचा शेंदुर फासलेला दगड आहे. बहिरी चा वापर आजूबाजूच्या ( राजमाची) किल्यावर पहारा देण्यासाठी केला जायचा. ढाक बहिरी किल्ला आणी या किल्ल्याच्या जवळच असणारा कळकराय हा सुळका इतिहास प्रेमी, गिर्यारोहक , साहस प्रेमी यांना आकर्षित करतो. कर्जत डोंगररांगेत येणारा हा ट्रेकर्सच्या दृष्टीने अत्यंत कठीण समजला जातो. ढाक भैरीला जाताना प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेचा जणू कस लागतो. आजकाल बरेच जण अर्धवट माहितीच्या आधारे किंवा साहस करण्याच्या उद्देशाने ढाकच्या किल्ल्यावर जातात. त्यांनी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे गिर्यारोहणाचे साहित्य व गिर्यारोहण तंत्राची माहिती असल्याशिवाय या किल्ल्यावर जाणे धोक्याचे आहे. यापूर्वी अनेक जणांचा या ठिकाणी पडून मृत्यु झालेला आहे. ढाक किल्ल्या वरील कातळाच्या पोटात ३ लेणी खोदलेली आहेत. येथ पर्यंत जाण्यासाठी अवघड कातळ टप्पा पार करावा लागतो. गुहेमध्ये पाण्याची २ मोठी टाक आहेत. यातील एका टाक्यामधील पाणी पिण्यासाठी वापरतात तर यातील दुस-या टाक्यांमध्ये गावकयांनी जेवणासाठी व जेवण बनवण्यासाठी काही भांडी ठेवली आहेत.

जेवण झाल्यावर ही भांडी धुवून पुन्हा या टाक्यातच ठेवली जातात. गुहेच्यावर दीड हजार फूटांची कातळभिंत आहे. गुहेच्या समोरच राजमाचीचे श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन बालेकिल्ले दिसतात. येथूनच नागफणीचे टोक , प्रबळगड , कर्नाळा, माथेरान असा विस्तीर्ण परिसर दिसतो. दुसर्‍या लेण्यात काहीही अवशेष नाहीत ,तर ३ रे लेणे अर्धवट खोदलेल्या स्थितीत आहे.ढाक बहिरीला पोचण्‍यासाठी पुणे – कामशेत – जांभिवली या मार्गाने, जांभिवली गावापर्यंत जाता येते. तेथून पुढे अर्धा ते पाऊण तास चालल्‍यानंतर कोंडेश्‍वर मंदिर लागते. तेथून जंगलवाट सुरू होते. त्‍या वाटेने पुढे गेल्‍यानंतर एक चिंचोळी 90 अंशा मधे उभी असणारी खिंड लागते. ही खिंड ढाकचा किल्‍ला आणि सरळसोट उभा कळकरायचा सुळका यांच्‍या मधोमध आहे. खिंड आठ ते दहा मीटर लांब आहे. खिंड उरण्यासाठी जाडजूड लोखंडी साखळ्या व रोप लावण्यात आले आहेत. खिंड पार केल्यावर पुढे कातळकडा लागतो. तो चढत असताना दोरखंडाचा वापर करावा. तो कडा पार करणे अवघड आहे. अतिउत्साही पणे जाऊन किंवा कोणत्याही सुरक्षिततेच्या साधनसामुग्री शिवाय जाऊन तेथे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

५ मिनिटाच्या रस्त्यासाठी अर्धा तास! राज ठाकरेंना अनुभवावं लागलं पुण्याचं ट्रॅफिक... रोज कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांच्या मनस्तापात भर

Car Prices: फक्त काही दिवस थांबा! गाड्या 1.5 लाखांनी स्वस्त होणार? काय आहे कारण?

Pasha Patel statement : ‘’... त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार’’; अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल अन् पाशा पटेलांचं वादग्रस्त विधान!

Ganesh Chaturthi 2025 : भाद्रपद महिना 'या' राशींसाठी घेऊन येणार मोठा ट्विस्ट, बाप्पाच्या येण्याने होणार संकटांचा विनाश

Solapur News: रहाटेवाडी-तामदर्डी पूल बांधकामासाठी कोटी ६ कोटी ५० लाख निधी मंजूर, जनतेच्या मागणीला यश

SCROLL FOR NEXT